25 कोटींबाबत ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

0

जळगाव । दि.8 । प्रतिनिधी-शहराच्या विकासाठी मुख्यमंत्र्यानी दिलेल्या 25 कोटीच्या निधीवरुन माजी स्थायी समिती नितीन बरडे यांनी पत्रकार परिषद घेवून आ. राजूमामा भोळे यांची खिल्ली उडवीली होती.

दरम्यान आज स्थायी समिती नितीन बरडे यांनी केलेल्या अरोपावर आज गटनेते सुनिल माळी यांनी पलटवार करीत 25 कोटीच्या निधीबाबत चोरट्यांच्या उलट्या बोंबा करीत असल्याचा पलटवार गटनेते सुनिल माळी यांनी केला आहे.

आ. राजूमामा भोळे यांना शहरातील नागरीकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी मनपात मांडलेले विषय हे नागरीकांच्या संबंधित त्या सोडविणे हा त्यांचा क्रमप्राप्त अधिकार आहे.

महापौर, उपमहापौर, व स्थायी सभापती बिनविरोध व्हावा म्हणून खाविआ व मनसेचे नेते यांनी आ.भोळे यांना सहकार्य मागितले होते. त्याचप्रमाणे नितीन बरडे यांनी आपल्या वार्डची विकासकामे होण्यासाठी आ.भाळे यांना निवेदन दिले होते.

शहराचे महापौर, उपमहापौर, व स्थायी सभापती खान्देश विकास आघाडी सभागृह नेते, गटनेते, प्रवक्ते यांनी भाजपने दिलेल्या निवेदनावर प्रतिक्रीया दिली नसून प्रतिक्रिया देणारे नितीन बरडे कोण? आहे असा सवाल गटनेते माळी यांनी उपस्थित केला आहे.

शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 25 कोटी दिले होते. मात्र हा निधी मनपाने घेतलेल्या कर्जांच्या व्याजापोटी निधी वापरण्याच्या डाव उधळून लावल्यामुळेच शहर विकास कामांना विलंब झाला असल्याचे माळी म्हणाले.

नितीन बरडे यांनी आल्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नये
नितीन बरडे यांनी आ.भोळे यांनी मालामाल विकलीच्या डायरेक्टर बनू नका? असे वक्तव्य केले होते. मात्र नितीन बरडे यांनी मालामाल विकली चित्रपटाचे खलनायक बनू नये.

तसेच मनपाचे अतिरिक्त आयुक्त यांना जे निवेदन सादर केले होते. त्यादिवशी लोकशाही दिन होता. परंतु हे निवेदन लोकशाही दिनाच्या वेळेनंतर अतिरिक्त आयुक्त परवानगी नंतरच देण्यात आले असल्याचे बरडे यांना ज्ञात असावे.

त्यामुळे बरडे यांनी आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नये, असा सल्ला सुनिल माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*