भडगावच्या पाणी पुरवठ्यासाठी गिरणेत तिसरी विहीर

0
भडगाव, | प्रतिनिधी :  येथे गिरणा पात्रात पुन्हा नव्याने विहीरीचे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. कॉलनी भागात बांधण्यात आलेल्या जलकुंभात आठ इंची जलवाहीनीने पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आठ दिवसाआड मिळणारे पाणी चार दिवसावर येणार आहे.

विहीरीचे भुमिपूजन-गिरणा पात्रात पालिकेची एक जुनी विहीर आहे. तिच्यात पाणी टाकण्यासाठी शेवडी ही आहे. तत्कालीन नगरध्यक्ष प्रशांत पवार यांच्या कार्यकाळात नव्याने विहीर खोदण्यात आली. पाईपलाईन करण्यात आली.
शामकांत भोसले यांच्या शेवटच्या सभेत नविन जलवाहीनी मंजुर होऊन कामाला गती देण्यात आली.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या कारकीर्दीत अजुन तिसर्‍या विहीरीचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. त्यांच्या शेताच्या बाजुला ही नविन विहीर खोदण्यात येणार आहे.

७ मीटर व्यास व ५० ङ्गुट खोल असलेल्या विहीरला साडेतेरा लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. भुमिपुजन वेळी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी राहुल पाटील, नगरसेवक अतुल पाटील, सुनिल देशमुख, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाप्रमुख इम्रान अली सैय्यद, वडध्याचे युवराज पाटील उपस्थितीत होते. दरम्यान नविन जलकुंभातुन पाणीपुरवठा सुरू झाल्यावर शहरात ३-४ दिवसाआड पाणी मिळु शकेल, असा विश्वास पालिका प्रशासनाला आहे.

शहरवासीयांना तीन ते चार दिवआड पाणी देण्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यादृष्टीनेच नियोजन सुरू आहे. विहीरीचे काम पुर्ण झाल्यावर मुबलक पाणी उपलब्ध होईल. तर पक्का बंधार्‍यासाठी आमदारांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.
..तर चार दिवआड पाणी-गिरणा पात्रातील नव्याने खोदण्यात आलेल्या विहीरीपासुन नवनाथ टेकडी जवळ बांधण्यात आलेल्या जलकुंभापर्यत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ही जलवाहीनी लोखंडी आहे. त्यामुळे मुख्य जलवाहीनीला जोडण्या घेण्याचा प्रश्न नाही. पर्यायाने जलकुंभ पुर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल.

ही जलवाहीनी आठ इंची आहे. तर जलकुंभापासुन पाचोरा रस्ता व बाळद रस्त्यापर्यंत दोन स्वतंत्र वितरीका आहेत. यासाठी जवळपास सव्वा कोटी खर्च अपेक्षित आहे. दहा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभातुन पाणी पुरवठा सुरू होईल तेव्हा शहरात चार दिवसाआड पाणी मिळेल, असा दावा पालिका प्रशासनाकडुन करण्यात येत आहे. तर नव्याने खोदण्यात येणार्‍या विहिरीचे पाणी जुन्या विहिरीत टाकण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*