गुगलच्या डुडलवर नृत्यांगना सितारा देवी

0
गुगलने सहा दशके कथ्थक नृत्याची आराधना करणार्‍या सितारा देवी यांच्या जन्मदिनी त्यांचे खास डुडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे.

कोलकातातील नर्तक सुखदेव महाराज याच्या घराण्यात ८ नोव्हेंबर १९२० रोजरी सितारा देवी यांचा जन्म झाला. वयाच्या ११ व्या वर्षापासून त्यां कथ्थक नृत्याचे कार्यक्रम करू लागल्यात.

लहान वयात कथ्थक नृत्यावर मिळविलेले प्रभूत्व पाहून रवींद्रनाथ टागोरही मंत्रमुग्ध झाले होते. त्यांनी सितारा देवींना नृत्यसम्राज्ञी ही उपाधी बहाल केली होती. १९७३ मध्ये त्यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला. त्यांना भारतरत्न मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती.

त्यांनी अनेक चिटपटातही काम केले होते. मधुबाला, रेखा, माला सिन्हा व काजोल यांना त्यांनी कथ्थक नृत्य शिकवले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईच्या जसलोक रूग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला.

LEAVE A REPLY

*