पाचशे नी हजाराच्या रद्द नोंटापासून लाकडी फलक

0
मुंबई | वृतसंस्था :   गत वर्षी भारतीय चलनातून बाद केलेल्या पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोंटापासून लगदा तयार करून तो लगदा लाकडाच्या लगद्यात एकजीव करून त्यापासून प्रचारासाठीचे लाकडी फलक तयार करण्यात येत आहे. सध्या अशा फलकांना दक्षिण आफ्रिकेत निर्यात केले जात आहे.

केरळमधील वेस्टर्न इंडिया प्लायवुडस ही कंपनी आणि रिझर्व्ह बँक यांच्यात झालेल्या करारानुसार बाद चलनाचे रूपांतर करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेत भारताप्रमाणेच सन २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

निश्चलीकरणानंतर जमा झालेल्या या पाचशे व हजार रूपयांच्या नोंटाचे करायचे काय ? असा प्रश्‍न होता. त्यावर तिरूवनंतपूरम च्या रिझर्व बँकेच्या विभागीय कार्यालयाने वेस्टर्न इंडीया प्लायवुडशी संपर्क साधून ही चिंता व्यक्त केली.

त्यानुसार काही नोटा प्रायोगीक तत्वावर कंपनीने ताब्यात घेत त्यांपासून लगदा तयार केला. हा लगदा लाकडाच्या लगद्यात एक जीव करून त्यापासून प्रचारासाठीचे लाकडी फलक तयार केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या सर्व नोंटांपासून लगदा तयार करून त्यापासून लाकडी प्रचार फलक तयार करण्यात येत आहे.

या फलकांना दक्षिण आफ्रिकेसह मध्य पूर्वेतील काही देशांना विकण्यात येणार आहे. चलनी नोटांपासून बनवलेले हे फलक अधिक कडक असून त्यांचे रूपही आर्कषक आहे. किरकोळ विक्रेते त्यांची चढ्या दराने विक्री करत असून त्याची मागणीही वाढत आहे.

LEAVE A REPLY

*