वायूसेनेच्या भरतीसाठी साडेचार हजार उमेदवारांची परीक्षा

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-भारतीय वायूसेनमधील एअमन ग्रुप वाय नॉनटेक्नीकल टे्रडस या पदाच्या भरतीसाठी जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील जवळपास साडेचार ते पाच हजारा उमेदवार दाखल झाले आहे.

सकाळी एकलव्य क्रीडासंकुलाच्या मैदानावर कागदपत्रांसह शारीरिक चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची उद्या दि.8 रोजी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेच्या पूर्व चाचणीत काही कागदपत्रांअभावी अपात्र ठरल्याने अनेक उमेदवारांना माघारी परतावे लागले.

भारतीय वायूसेनेतील एअरमॅन ग्रुप वाय नॉनटेक्नीकल ट्रेडस (ऑटोमोबाईल टेक्निशियन, जी. टी. आय व आयएएफ (पी) या पदासाठी आज पासून मू. जे. महाविद्यालयाच्या एकलव्य मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.

सकाळी 6 वाजेच्या सुमारास एकलव्य क्रीडा संकुलाच्या मागील प्रवेशद्वाराने उमेदवारांना कागदपत्रांची पुर्तता आणि उंची मोजण्यासाठी लाबंलचक रांग लागली होती. यावेळी जवळपास साडेचार ते पाच हजार उमेदवार आले होते.

उमेदवारांच्या कागदपत्रांनी तपासणी व उंची मोजून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक टप्यात 350 उमेदवारांची लेखी परीक्षा झाली.

आज मैदानी चाचणी
कागदपत्रांसह शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची उद्या दि.8 रोजी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. याबाबत किती उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरलेत याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही.

उमेदवारांचा हिरमोड
वायू सेना पदांच्या भरतीसाठी इयत्ता दहावी व बारावीच्या मूळ गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. तसेच उमेदवाराला 50 टक्के गुणांसह 13 जानेवारी 1998 ते 27 जून 2001 दरम्यान उमेदवारा जन्म झालेला असल्याची अट होती.

परंतु भरतीसाठी आलेल्या काही उमेदवारांनी कागदपत्रांची पुर्तता न केल्याने पहिल्याच चाचणीत अपात्र ठरले. त्यामुळे सकाळपासून रांगेत उभे राहणार्‍या अनेक उमेदवारांचा हिरमोड होवून परतावे लागले.

खा.ए.टी.पाटील यांच्या हस्ते भरती मेळाव्याचे उद्घाटन
मु.जे.महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलातील मैदानावर वायुसेनेच्या भरती मेळाव्याचे उद्घाटन खा.ए.टी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.राजूमामा भोळे, प्राचार्य डॉ.उदय कुळकर्णी यांच्यासह वायुसेनेचे अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*