बीडीओला आत्महत्त्येस प्रवृत्त करणार्‍यांना अटक न केल्यास आंदोलन

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-चाळीसगाव पंचायत समितीमधील बीडीओ मधुकर वाघ यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना कार्यालयात अपमानस्पद वागणूक दिली. त्यामुळे बीडीओंनी कार्यालयात विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बीडीओंना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यांना तात्काळ अटक करा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला.

बीडीओ वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संशयितांना अटक करावी, तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, या मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.

संशयीतांना तात्काळ अटक न केल्यास चर्मकार महासंघातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशार देण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानूदास विसावे, जिल्हाध्यक्ष पांडूरंग बाविस्कर, ईश्वरलाल अहिरे, धनराज पवार, भगवान बाविस्कर, गलू ठोसर, प्रा. एम. बी. लाड, प्रा. अनिल वाघमारे, नागदेव मोरे, प्रदिप वाघ, धोंडीराम मोरे, भगवान बाविस्कर, जयश्री विसावे, भारती बाविस्कर, कमलबाई सोनवणे, लहू मोरे, रावसाहेब वाघ, ज्ञानेश्वर बोरसे, सुनिल चव्हाण, मुकेश मोरे, विजय गांगुंर्डे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*