पारोळ्याजवळील चहुत्रे फाट्याजवळ गाडीच्या धडकेत शिक्षक दाम्पंत्याचा मृत्यू

0

पारोळा । प्रतिनिधी :  कासोदा रस्त्यावरील चहुत्रे फाट्याजवळ बालाजी नमकीन च्या गाडीची मोटर सायकल ला धडक दिल्याने नगाव येथील जि प शाळेचे शिक्षक भागवत महादू पाटील रा मंगरूळ तसेच त्यांच्या पत्नी अल्काबाई भागवत पाटील मुळगाव मंगरूळ ता पारोळा यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

याबाबत पारोळा नाथजी नगर येथे राहणारे भागवत महादू पाटील हे आज हरतालिका असल्याने दोघ पती,पत्नी हे मोटारसायकल वर पद्मालय येथे दर्शनासाठी गेले असता त्यांच्या मोटारसायकलला चहुत्रे फाट्यानजीक बालाजी नमकीन वाहतूक करणाऱ्या छोटी मालवाहू गाडीने धडक दिल्याने दोघ जण जागीच मरण पावले.

त्या दोघ मयत यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर कुटीरमद्ये शिक्षकांसह मंगरूळ,नगाव,पारोळा व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी गर्दी केली होती

LEAVE A REPLY

*