मैत्री आदर्श ठरावी….

0
मैत्रीची व्याख्या आपण करू शकत नाही. पण रक्ताच्या नात्यापेक्षा जी जवळची वाटते ती मैत्री. मैत्री करायची शिकवाव लागत नाही. ते मुळातच आपल्या अंगी असते. शाळेचा पहिला दिवस तिथे आपण कोणाला ओळखत नाही म्हणून शाळेत जाण्यास नाकारतो. पण जेव्हा आपली तिथे आपल्यासारख्या व मित्र मैत्रीणींना भेटतो त्यांच्यासोबत बोलतो, खेळतो, डबा खातो त्यावेळी आपली मैत्री होते. मग आपल्याला असे मित्र हवेहवेसे वाटतात.

दररोज मैत्रीणीसोबत खेळायला त्यांच्याशी बोलायला, हुंदडायला आवडू लागते. आणि अशीच मैत्री घट्ट होते की, त्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही. त्याचप्रमाणे कॉलेजला सुध्दा मैत्री बनते आणि ती मैत्री इतकी घट्ट होते की ती मैत्री आणि आपण नेहमी सोबत राहतो. जर आपण आजारी असलो तर काळजी ने सर्व नोटस आपल्यापर्यंत पोहोचवते. एखाद्या दिवशी जर का आपण एकटे दिसले तर समोरून विचारला जाणारा प्रश्न तुझ्यासोबतची कुठे गेली, अशी ही मैत्री फक्त आपल्याजवळ आहे याचा अभिमान वाटतो.

मैत्री ही एक प्रकारचे व्यसनच म्हणता येईल. एकदा का मैत्री झाली की आपण त्याशिवाय राहूच शकत नाही. पण मैत्री ही चांगली असावी. आपल्या सोबतच्या मैत्रीणीवरून आपली ओळख असते जर चुकून वाईट संगत मिळाली तर आपली ओळख पण त्यातलीच होते म्हणून मैत्री करतांना सुध्दा विचारपूर्वक करायला पाहिजे. मैत्री ही प्रामाणिक असावी फक्त कामापुरती नसावी. अडचणीच्या वेळी मदत करायला मागे न सरणारी, मदत करणारी हवी.

काही वेळा तर आपली अडचण व समस्या आली की, त्यावर योग्य मार्गदर्शन करणारी मैत्री असावी लागते. मैत्री वय बघून होत नाही. आपली बरोबरीची मैत्रीण असते. त्याप्रमाणे आपले आजोबा, आजी, भाऊ, बहिण हे सुध्दा आपले मित्र, मैत्रीणी असतात. आपण नवीन मैत्रीणी केव्हा पण करू शकतो. लहानपणी, तरूणपणी किंवा वृध्द असतांना पण नवीन व्यक्तींना आपण मित्र मैत्रीण बनवू शकतो.

अगोदरच्या काळात मैत्रीसाठी काही विशिष्ट दिवस ठरलेला नसायचा जिथे मैत्रिणी जमल्या तिथच गप्पा-गोष्टी सुरू व्हायच्या. मैत्री दिवसाचा सर्व आनंद त्याच दिवशी असायचा.

हल्लीच्या या सोशल मिडियामुळे सर्व काही कमी झालयं. मैत्रीणी ह्या भेटतात. पण फक्त ऑनलाईन सर्व काही आनंद, दु:ख व्यक्त केले जाते ते फक्त इन्जाय पाठवून बोलायच म्हटल तर कॉलींग, भेटायच म्हटल तर व्हिडिओ कॉल म्हणजे समक्ष भेटण्यापेक्षा आता फक्त कॉल वर भेटण्यात धन्यता मानतो.

पण ही झाली नाण्याची एक बाजू दुसरी बाजू जर बघितली तर आपल्या जवळची मैत्रीण जी आता आपल्यापासून लांब आहे. तिच्यासोबत सुध्दा आपण आपली समस्या (अडचण) सोडवू शकतो. त्याचप्रमाणे जवळच्या मैत्रीणीशी बोलून मन मोकळे करता येते. मैत्री ही आजपासून नाही जुन्या काळापासून सुध्दा मैत्री होती. जीचे आतापण उदाहरण देतात कृष्ण-सुदामा, कृष्ण-अर्जुन, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन हे सर्वांचे तर मैत्री म्हटल की पहिले आठवण करून दिली जाते.

खरी मैत्री ही अशी असते की ती आपल्यात चांगल्या गुणांना वाव देते. आपल्याला चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवते. चुका दुरूस्त करायला मदत करणारी मैत्री असायला हवी.

जेव्हापासून खरी मैत्री झाली तेव्हापासून आत्मविश्वास वाढला. निर्णय ठाम झाले. सकारात्मक विचार करण्याच्या क्षमतेत वाढ झाली. खरोखर खरी मैत्री पैशात नव्हे तर सद्गुणात मोजली जाते. अशा मैत्रीदिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

LEAVE A REPLY

*