Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

मोंदीवरील चित्रपट शालेय विद्यार्थ्याना दाखविण्याची शाळांना सक्ती : प्रचार तंत्राचा असाही वापर

Share
मुंबई : आगामी निवडणूका लक्षात घेता शतप्रतिशत जिंकण्यासाठी अवलंबिल्या जाणार्‍या प्रचार तंत्राचा आता शालेय विद्यार्थ्यांवर वापर केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला ‘ चलो जीते हैं” हा 32 मिनीटांचा लघुपट शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्याचा फतवा काढण्यात आलेला आहे.

बालमानसशास्त्र ओळखत प्रचाराचा हा नवा मार्ग अवलंबिला जात आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेत हा शालेय अभ्यासाऐवजी हा चित्रपट वर्गात सक्तीने पहावा लागणार आहे.

मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केलेला ३२ मिनिटांचा हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांना अशा प्रचारतंत्रात का ओढले जात आहे, असा सवाल काही शिक्षकांनी केला आहे.

काही जिल्ह्य़ातील केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील मंगळवारी elearning. parthinfotech.in  या संकेतस्थळावर हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तो सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.

अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून देण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.  हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर  याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये पार पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!