हिंदू धर्मावर आपल्याच लोकांकडून हल्ले

0

जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-सध्याच्या परिस्थितीत परकीयांपेक्षा आपल्याच लोकांकडून हिंदू धर्मावर शाब्दीक हल्ले होत असून हे घरभेदी रोखले गेले पाहिजे, असे मत करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी ‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केले.

करवीरपिठाचे शंकराचार्य जगद्गुरुविद्यानृसिंह भारती हे आज श्री संत गजानन महाराज रथ समर्पण सोहळ्यासाठी जळगावात आले आहे.

यादरम्यान त्यांच्याशी संवाद साधला असता शंकराचार्यांनी बाबा, बुवा, महाराज यांच्याविषयी सुरु असलेल्या सध्यपरिस्थितीबाबत बोलतांना सांगितले की, धर्माचे पालन होत नसल्याने, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.

गुरु गोविंदसिंगांनी कुणालाही उत्तराधिकारी न करता ग्रंथ साहिबला गुरु मानण्याचे सांगितले होते, असे असतांना भक्त जर व्यक्तीच्या मागे धावत असतील तर ते अधर्माचेच पालन आहे.

‘पानी पिना छानके, गुरु करना पहचानके’, अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. गुरु स्वीकारण्याआधी त्याची परीक्षा घेतली पाहीजे. कारण गुरूआधी तो एक व्यक्ती असतो.

त्यानंतरच अध्यात्मिक संबंध स्थापीत झाले पाहीजे. सध्याच्या काळात धर्माच्या आधारावर राजकारण केले जात आहे. राजकारणासाठी धर्माचा, जातीचा उपयोग केला जात आहे.

आरक्षण द्यायचे आणि दुसरीकडे धर्मनिरपेक्षची भाषा करायची असा विरोधाभास असता कामा नये. मंदीरांच्या अधिग्रहणासंदर्भात सरकार जर निधर्मी पध्दतीने काम करीत असेल तर ते योग्य नसल्याचे शंकराचार्यांनी सांगितले.

कोल्हापुरच्या महालक्ष्मी मुर्तीच्या वादासंदर्भात आम्ही सगळ्या प्रकारचे पुरावे सरकारला दिले आहे. मात्र सरकार त्याबाबत फारसे सकारात्मक नाही.

हिंदू धर्मावरील आक्रमणासंदर्भात बोलतांना शंकराचार्यांनी सांगितले की, आपलेच लोक आपल्याच धर्माविरूध्द बोलत आहे. हे घरभेदी रोखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पीठांची स्थापना होतांना धार्मिकता राखण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे कुठलेही तंटे आधी पीठासमोर सुटले पाहीजे असेही त्यांनी सांगितले.

श्रध्दायुक्त अंत:करणाने धर्म जाणुन घेऊन आपल्या वाटेला आलेले कर्म आनंदाने करावे असा संदेशही जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी तरूणपिढीला दिला आहे.

LEAVE A REPLY

*