2022 पर्यंत गरिबी, दहशतवाद हद्दपार

0

नवी दिल्ली । दि.4 । वृत्तसंस्था-देशातून 2022 पर्यंत भ्रष्टाचार, दहशतवाद, गरिबी, जातीवाद हद्दपार होणार असल्याचा दावा नीती आयोगाने केला आहे.

गव्हर्नस कॉन्फरन्समध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ‘इंडिया अ‍ॅ़ट 2022’ या दस्ताऐवजाचे सादरीकरण केले. भारताने 2047 पर्यंत विकास दर 8 टक्के इतका कायम ठेवला तरी जगातील सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश होऊ शकतो, असेही नीती आयोगाच्या दस्ताऐवजात म्हटले आहे.

न्यू इंडिया अ‍ॅट 2022 नुसार, भारत 2022 पर्यंत पूर्णत: कुपोषण मुक्त होईल. तर, प्रधानमंत्री ग्रामीण रस्ता योजनेंतर्गत 2019 पर्यंत देशातील सर्व गावे रस्त्यांनी जोडली जातील.

त्याशिवाय देशात 2022 पर्यंत 20 हून अधिक जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था असणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तर, 2022 पर्यंत भारतातून गरिबीचे उच्चाटन होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेंतर्गत येणार्‍या गावांना ‘मॉडेल व्हिलेज’चा दर्जा मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*