…तर पुन्हा हात जोडणार नाही !

0

मुंबई । दि.4 । वृत्तसंस्था-फेरीवाल्यांची बाजू घेणार्‍या नाना पाटेकर यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. माहिती नाही, त्या गोष्टींबद्दल नाना पाटेकरांनी चोंबडेपणा करु नये, असा सल्ला देत राज ठाकरे यांनी नानांची मिमिक्रीही केली.

मुंबईत मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधातील कारवाईबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं.

या आंदोलनात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या आणि ज्यांच्यावर केसेस पडल्या आहेत, त्यांचं राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं.

नाना पाटेकरांचा घेतला समाचार
फेरीवाल्यांची बाजू घेणार्‍या नाना पाटेकर यांच्यार राज ठाकरेंनी निशाणा साधला. माहित नाही त्या गोष्टींमध्ये नाना पाटेकरांनी चोंबडेपणा करणं बंद करावं.

पाण्याचा प्रश्न सरकारकडून सुटत नव्हता म्हणून नानांनी पुढाकार घेतलाच ना. तसंच सरकारकडून सुटत नाही त्या प्रश्नासाठी रस्त्यावर आम्ही काय करायचं, हे नानांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात राज ठाकरेंनी नानांना सुनावलं. मराठी

सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हत्या त्यावेळी नाना कुठे दिसले नाही. त्यावेळी मनसेने लढा दिला आणि मराठी सिनेमांना प्राईम टाईम शो मिळवून दिले, असं म्हणत नानांचा राज ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला.

 

LEAVE A REPLY

*