मोदींपेक्षा देवेंद्र बरे – अण्णा

0

नगर । दि.4 । प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री राळेगणसिद्धीत आले याचा अर्थ आपण लोकपालच्या आंदोलनावरून मागे हटणार असा होत नसल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले. लोकपाल कायद्यासाठी दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत आंदोलन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

देशातील पहिल्या सौर कृषी फीडर योजनेचे मुख्यमंत्री फडणवीस व ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे हस्ते रिमोट कंट्रोलने भूमिपूजन करण्यात आले.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अण्णा हजारे व्यासपीठावर एकत्र होते. कार्यक्रम स्थळाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री निघाल्यानंतर अण्णा हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगेलच आहेत. मात्र, आपण लोकपालच्या आंदोलनावरून मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांवर बाटलीफेक
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राळेगणसिद्धी येथील सभेत एका मूक-बधीर तरुणाने त्यांच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावल्याचा प्रकार घडला आहे.

प्रशांत महादेव कानडे असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दिव्यांग असलेल्या प्रशांतला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार हवाय.

त्याने बर्‍याच ठिकाणी प्रयत्न केला, पण मूक-बधीर असल्याने त्याला कुणीच नोकरी दिली नाही. शेवटी, बँकेत शिपायाची किंवा तत्सम नोकरी मिळावी, यासाठी त्याने जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री सचिवालयाला पत्र दिले होते.

परंतु, दहा महिन्यांनंतरही त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रशांतच्या रागाचा आज उद्रेक झाला.

 

LEAVE A REPLY

*