वादग्रस्त विधानाप्रकरणी राम कदमांवर गुन्हा नोंदवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

0
मुंबई : भाजपाचे आ. राम कदम यांनी दहिहंडीच्या वेळी महिला व मुलीविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी याचिका मुंबईच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनुसार न्यायालयाने जर पोलिंसाना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले तर आ. कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

‘एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन. शंभर टक्के चुकीचे असले तरी मी मदत करेन’, असे वादग्रस्त वक्तव्य कदम यांनी आपल्या दहीहंडी आयोजनात उपस्थित गोविंदांसमोर जाहीरपणे केले होते.

या वादग्रस्त व कायद्याच्या विरुद्ध वक्तव्याने आपण दुखावलो. त्यामुळे पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात तात्काळ लेखी तक्रार देऊन गुन्हा नोंदवण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी वारंवार टाळाटाळ करत गुन्हा नोंदवणे टाळले आहे. पोलिसांची ही कृती बेकायदा असल्याने त्याची दखल घ्यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी याचिकेत केली आहे.

तसेच पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्याची विनंती त्यांनी केली आहे. याविषयी लवकरच न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*