अर्थशास्त्र हे समाजातील विविध प्रश्नावर उपाययोजनेचे शस्त्र- प्रा.डॉ.आर.एस.माळी

0
फैजपूर |  वार्ताहर :  येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात मराठी अर्थशास्त्र परिषद आणि धनाजी नाना महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. ३, ४ व ५ नोव्हेंबर २०१७ रोजी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन दि. ३ नोहेंबर रोजी प्रा डॉ केशव तुपे, सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरू प्रा. डॉ. आर. एस. माळी होते. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

यासोबत व्यासपीठवर प्रा. डॉ. रामचंद्र रसाळ, अध्यक्ष, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४१ वे अधिवेशन, डॉ. सदानंद पाटील, ऍडीशनल कमिशनर सोशल वेलङ्गेअर, महाराष्ट राज्य प्रा. डॉ. केशव तुपे, सह संचालक उच्च शिक्षण, जळगाव, प्रा डॉ शिवाजी भोसले, माजी आ. शिरिष चौधरी, माजी अध्यक्ष प्रमुख अतिथी उपस्थित होते.

प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, प्रा डॉ राजेंद्र भांडवलकर, प्रा डॉ चारुदत्त गोखले यांनी राष्ट्रीय अधिवेशनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या माजी अध्यक्ष, कार्यकारणी सदस्य, सल्लागार समिती सदस्य, इ. चा संस्था आणि परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना मा सदानंद पाटील यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत अर्थतज्ज्ञांकडून भविष्याच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. उद्घाटनपर भाषणात प्रा.डॉ. केशव तुपे यांनी अर्थशास्त्र विषय अमूल्य योगदानाबद्दल विवेचन करीत अधिवेशनाचे यश चिंतिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ आर एस माळी यांनी शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी समाज उभारणीत मोलाचे योगदान देऊ शकतात, असा आशावाद व्यक्त केला.

आपल्या बीज भाषणात अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा डॉ रामचंद्र रसाळ यांनी महाराष्ट्रातील शेती: आव्हाने आणि संधी याबाबत संशोधन मांडले. अधिवेशनाचा सार सरकार दरबारी सादर करून सद्य स्थितीतील समस्यां सोडविण्यावर भर दिला.

कार्यक्रमाला  शिरीष मधुकरराव चौधरी स्वागताध्यक्ष तथा अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ ङ्गैजपूर, सर्व पदाधिकारी, माजी आमदार अरुण पाटील, शरद महाजन, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, इतर शाखांचे प्राचार्य, प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण, स्थानिक कार्यवाह, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि परिश्रम लाभले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजश्री नेमाडे आणि प्रा.राजेंद्र राजपूत यांनीं केले.

LEAVE A REPLY

*