गोवंडीतील दहावीचा मुलगा ठरला डार्क नेटचा शिकार

0
मुंबई : वृत्तसंस्था | आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या ब्लु व्हेल या इंटरनेटच्या खेळानंतर आता डार्क नेट या खेळाचा गोंवडीतील दहावीचा मुलगा शिकार झाला आहे.

या खेळातील तिसर्‍या टप्प्यातील आव्हानानुसार या मुलाने आपले घर सोडले असून माझा शोध घेवू नका अशी चिठ्ठीही त्याने लिहून ठेवली आहे. याबाबत पोलिसांनी तपास केला असता त्यास इंटरनेटवर गेम खेळण्याची खूप आवड होती. त्यातून तो डार्क नेटच्या संपर्कात आला.

२९ ऑक्टोबर रोजी त्याचे कुटूंबिय चित्रपट पाहण्यासाठी गेले असतांना रात्री ९ च्या सुमारास त्याने घरातील १५ हजार रूपये घेवून निघून गेला आहे. याबाबत पोलिस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

*