
नवी दिल्ली : देशभरातील बँकांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांबाबतची माहिती व कोणावर कारवाई करायची त्यांची नावेही पंतप्रधान कार्यालयास दिली होती. पंरतू पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. असे लेखी पत्र रिझर्व बँकेचे तत्कालीन गर्व्हनर रघुरात राजन यांनी संसदीय समितीला लिहीले आहे. या पत्रानुसार जर सत्य मानले तर बँकेतील घोटाळ्यांना पंतप्रधान कार्यालयानेच पाठिशी घातल्याचे सिध्द होत आहे.
रघुराम राजन हे सप्टेंबर २०१६पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. आता ते शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसेमध्ये शिकवत आहेत. बँकांमधील घोटाळ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पण अनुत्पादित मालमत्ता म्हणजे (NPA)च्या तुलनेत हा आकडा छोटा आहे, असं राजन म्हणाले.
युपीए सरकारच्या काळात सरकारी बँकांमधील गैरव्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी आपण फोरम नेमलं होतं. बँकांमधील गैरव्यवहारांबाबत तपास यंत्रणांशी या फोरमद्वारे समन्वय ठेवण्यात येत होता. यानुसार पंतप्रधान कार्यालयाला आपण बहुचर्चित बँक घोटाळ्यांची यादीही दिली होती.
तसंच या प्रकरणांमध्ये एक दोघांविरोधात कारवाई करता येईल, असंही स्पष्ट केलं होतं. पण या प्रकरणांवर पुढे काय कारवाई झाली हे कळलचं नाही. मात्र, अशा प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई झाली पाहिजे, असं राजन यांनी नमूद केलंय.