जळगावला कार्तिक स्वामी मंदिर आजपासून तीन दिवस खुले

0

जळगाव |  प्रतिनिधी :  कार्तिक स्वामी पौर्णिमेनिमित्त शहरातील निवृत्तीनगरातील कार्तिक स्वामी मंदिर उद्या दि.३ पासून सलग तीन दिवसभर खुले राहणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

केरळी महिला ट्रस्टतर्फे निवृत्ती नगरात येथे १७ वर्षापूर्वी श्री अय्यप्पा स्वामी पंचायत मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. हे मंदिर दाक्षिणात्य शिल्पकलेच्या उत्कृष्ट कलाकुसरीचा नमुना आहे. या मंदिराच्या जागेत अय्यप्पा स्वामी मंदिर, गणपती मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर व श्री. महाविष्णू शिवशंकर, श्री देवी मदुराई मिनाक्षी मंदिर व श्री नवग्रह अशी कौलारु मंदिरे आहे.

जळगावकरांना दक्षिणेकडील देवतांचे दर्शन व्हावे या मंदिरांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे दर्शन घेतल्यानंतर धनलक्ष्मी प्राप्त होते अशी श्रध्दा आहे. त्यामुळे उद्या दि.३ रोजी दुपारी १.३० वाजेपासून दि.४ रोजी सकाळी १०.४५ वाजेपर्यंत पौर्णिमा असल्याने मंदिर दिवसभर खुले राहणार आहे.

तसेच कृतिका नक्षत्र दि.४ पासून दि.५ च्या रात्री १०.३० वाजेपर्यंत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केरळी महिला ट्रस्टच्या अध्यक्षा वासंती अय्यर यांनी केले आहे.

शहरातील मंदिरांमध्ये देखील धार्मिक कार्यक्रम

निवृत्ती नगरातील कार्तिक स्वामी मंदिरासह शहरातील पत्र्या हनुमान मंदिराजवळील कार्तिक स्वामी मंदिर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील मंदिर, पिंप्राळयातील मंदिर याठिकाणी असलेल्या कातिकि स्वामी मंदिरात देखील दि.३ व ४ रोजी विविध धार्मिक कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

कार्तिक पौर्णिमेनिमित्त केरळी महिला ट्रस्टतर्फे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात पहाटे पुजा,अभिषेक, आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*