केमिकल गळतीतील दुसर्‍या कामगाराचाही मृत्यू

0

जळगाव | प्रतिनिधी :  शहरातील एमआयडीसीतील गितांजली केमिकल्स कंपनीत उत्पादन विभागातील केमिकल वाहून नेणारा पाईप लिकेज झाला होता. केमिकल अंगावर पडल्याने कंपनीतील कर्मचारी सुनिल चौधरी व प्रकाश तिवणकर हे दोन्ही भाजले गेले होते. यातील सुनिल चौधरी यांचा ४ दिवसापूर्वी मृत्यू झाला होता.

दरम्यान आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणार्‍या दुसर्‍या जखमीचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश बळीराम तिवणकर वय ५० असे मयताचे नाव आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसीतील गितांजली केमिकल्स कंपनीत प्रकाश बळीराम तिवणकर व सुनिल चिंतामण चौधरी हे दोघे कामाला होते. दि.२६ रोजी कंपनीत काम करीत असतांना उत्पादन विभागातील केमिकल वाहून नेणार पाईप लिकेज झाला.

लिकेज झालेल्या पाईपामधून विषारी रसायन त्याठिकाणी काम करीत असलेले प्रकाश तिवणकर व सुनिल चौधरी यंाच्या अंगावर पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान दोघांवर गणपती हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते.दि.२९ रोजी सुनिल चौधरी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारा दुसरा जखमी प्रकाश तिवणकर यांचा पहाटे २.४० वाजेच्या सुमारास उपचारादरमयान मृत्यू झाला. या घटनेमुळे तिवणकर कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला. मयत प्रकाश तिवणकर हे मुळ साकेगाव येथील रहिवाशी असलेल्याने ते कामानिमित्त अनेक वर्षापासून जळगावात राहत होते.

याप्रकरणी डॉ. ओसवाल यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, भावजायी असा परिवार आहे.

मुलाला नोकरी लावून देण्याचे कंपनीकडून लेखी आश्‍वासन

केमिकल गळतीतील दुसरा जखमी प्रकाश तिवणकर यांचा मृत्यू झाल्याचे कळताच गितांजली केमिकल्स कंपनीचे एम.डी जे.वाय.पाटील, अकाऊंट विभागाचे अधिकारी श्री. झंवर यांनी रुग्णालयात येवून तिवणकर कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

यावेळी कुटुंबियांनी दोन्ही मुलांना नोकरी लावून देण्याची मागणी केली. यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांनी प्रकाश तिवणकर यांचा मोठा मुलगा केदार याला कायमस्वरुपी १ एप्रिल २०१८ पासून नोकरी, प्रकाश तिवणकर यांच्या पत्नीला पेन्शन व अंत्यविधीसाठी तात्काळ १० हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

*