पिवळसर अन् दुर्गंधीयुक्त होणार्‍या पाणीपुरवठ्यावर उपाययोजनेसाठी राष्ट्रवादी महानगरतर्फे मनपासमोर उपोषण

0
जळगाव |  प्रतिनिधी :  वाघुर धरणावरुन जळगाव शहराला वितरीत होणार पाणीपुरवठा पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त होवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तात्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगरतर्फे महानगरपालिकेसमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले.

पाणीपुरवठ्याच्या तक्रारी न सोडवल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देखील राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला आहे.

जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी आहेत. फिल्टर प्लॉन्टमधून होणारा पाणीपुरवठा वितरीत केला जातो. परंतु अद्यापही शिवाजी नगर, खोटेनगर, पिंप्राळा, महाबळ, कालिंका माता मंदिर, एमआयडीसी परिसरातील टाक्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही.

त्यामुळे जळगाव शहरातील ५ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टाक्यांची साफसफाई करुन जीर्ण अवस्थेत असलेल्या टाक्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतर्फे महानगरपालिकेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेचे पदाधिकारी यांनी पाणीपुरवठ्याच्या तक्रारी न सोडवल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील राष्ट्रवादी महानगराध्यक्ष निलेश पाटील यांनी दिला आहे.

उपोषणात मंगला पाटील, निला चौधरी, प्रतिभा शिरसाठ यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सायंकाळी महापौर ललित कोल्हे उपोषणस्थळी भेट देवून पाण्याच्या टाक्या साफसफाई करण्याचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

*