पारंपारीक वाद्यावर भक्तीमय वातावरणात उत्सव साजरा करा : पोलीस अधीक्षक

0
चोपडा  : प्रतिनिधी |   गणेश भक्तांनी गणेश उत्सव डीजे व डॉल्बी मुक्त करून  पारंपारीक वाद्यावर भक्तीमय वातावरणात तल्लीन होऊन साजरा करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी नगरपरिषदेच्या नाट्यगृह येथे झालेल्या गणेशोत्सव व मोहरम निमित्त शांतता बैठकीत गणेश भक्ताना केले.

चोपडा शहरात जातीय सलोखा व राष्ट्रीय एकोपा याठिकाणी आहे. डीजे व डॉल्बी मुक्त उत्सव साजरा करा.ढोल ताशेच्या व टाळ मृदंगांचा तालावर लय पध्दतीत भक्तरसात तल्लीन होऊन नाचतांना एक समानता व एकता निर्माण होतांना दिसते. गणेश भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून राज्यशासनाच्या जातीया सलोखा या योजनेमधुन संपुर्ण जिल्हामध्ये विघ्नहर्ता पुरस्कार जाहीर करणार आहोत.

त्यासाठी पोलिस स्टेशनला मुल्याकंन समिती असेल गणेश स्थापने पासून ते विसर्जना पर्यंत मंडाळांचे मुल्याकन केले जाईल त्यांचा गौरव जिल्ह्यावर पालकमंत्री जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी ,अधिकारी यांचा उपस्थितीत २००० रूपये रोख व प्रशिस्त पत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निबाळकर, अरूणभाई गुजराथी, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे ,माजी आ. कैलास पाटील , अमृतराव सचदेव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निबाळकर ,विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी,माजी आ.कैलास पाटील ,माजी शिक्षकआ.दिलीप सोनवणे,पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांतधिकारी संजय गायकवाड , नगराध्यक्ष मनिषा चौधरी , उपनगराध्यक्ष सुप्रिया सनेर,विजयाताई पाटील,पंचायत समिती सभापती आत्माराम माळके , तहसिलदार दीपक गिरासे ,गटविकास अधिकारी बी .एस .कोसोदे,मुख्याधिकारी बबन तडवी,पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,व्हॉ.चेअरमन प्रविणभाई गुजराथी, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे,जि.प.सदस्य प्रा.डॉ.निलिमा पाटील,गजेंद्र सोनवणे, चंद्रहासभाई गुजराथी,व्यापारी महामंडळाचे अमृतराव सचदेव,गटनेते जिवन चौधरी , अजगरअली सैय्यद ,शिवसेना तालुका प्रमुख राजू बिटवा,शहर प्रमुख आबा देशमुख, शिवसेनेचे गटनेते भैय्या पवार,नगरसेवक हितेंद्र देशमुख,किशोर चौधरी,राजाराम पाटील,अशोक बाविस्कर,गजेंद्र जयस्वाल, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते,गणेश भक्त व मुस्लिम पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलिस उपविभागीय अधिकारी विजयकुमार चव्हाण यानी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

*