जळगाव जिल्ह्यातील ३७० गावे दुष्काळाच्या छायेत

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्ह्यातील १५०२ गावांपैकी ३७० गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याने ही गावे दुष्काळाच्या छायेत आली आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातील १५०२ गावांची पैसेवारी मोजण्यात आली. १५०२ गावांपैकी ३७० गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत तर ११३२ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्यावर राहीली आहे.

५० पैशांच्या आत असलेली ३७० गावांमध्ये पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. यात पारोळा तालुक्यातील ३५, बोदवड ५१, मुक्ताईनगर ८१, यावल ३, अमळनेर १५४ आणि चाळीसगाव ४६ अशी ३७० गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे.

दि.३१ डिसेंबर रोजी अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात येवून राज्य शासनातर्फे दुष्काळाबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*