होय कर्जमाफीत गोंधळच !

0

जळगाव । दि. 2 । प्रतिनिधी-जिल्ह्यासह राज्यात कर्जमाफीबाबत गोंधळच झाला असल्याची कबुली सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, राज्यशासनाने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. सद्यस्थितीला राज्यातील 2 लाख 89 हजार शेतकर्‍यांची 654 कोटींची कर्जमाफी झाली आहे.

काही शेतकर्‍यांच्या नावांमध्ये गोंधळ झाला आहे हे खरे आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफी देण्याबाबत सकारात्मक आहे.

परंतु जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था कायम राहील, असेही ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेने सर्वात आधी कर्जमाफीची मागणी केली होती. 2017 पर्यंतच्या सर्व शेतकर्‍यांची कर्जमाफी करायला पाहिजे होती. शासनाच्या पोर्टलवरुन यादी गायब कशी झाली? हा मोठा प्रश्न आहे.

प्रातिनिधी स्वरुपात ज्या शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली त्यांना देखील काही ठिकाणी या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकरी संभ्रमीत असल्याचे ना.पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*