जळगाव येथे ‘एयर फोर्स’ची भरती

0

पारोळा, । दि. 2 । प्रतिनिधी-जळगाव येथील एम जे कॉलेज पटांगणावर दि.7 नोव्हेंबर रोजी शासकीय एयर फोर्सची भरती सकाळी 6 वाजेपासून होणार असल्याची माहिती खा ए.टी.पाटील यांनी पारोळा येथे पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत त्यांनी स्पष्ट केले कि खानदेशातील तरुणांना वाव मिळावा व आपल्या परिसरात नेव्ही, आर्मी व एयर फोर्स सारख्या भरत्या होणे कामी सन 2014-15 मध्ये संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत होतो.

त्याबाबत त्यांच्या विभागाने तब्बल 23 जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या एयर फोर्सच्या शासकीय भरतीबाबत मंजुरी दिल्याने याचा लाभ आपल्या परिसरातील तरुणांना मिळणार आहे.

भरती प्रकिया हि निष्पक्ष होणार असून यात पहिल्या फेरीमध्ये मुळ प्रमाणपत्र ज्यात 10 वी 12 वी यासह डोमेसाईल,ज्यानी महराष्ट्रा बाहेर परीक्षा दिल्या असतील त्यांना आवश्यक असून दुसर्‍या फेरीमध्ये 50 प्रश्नांची लेखी चाचणी जी 45 मिनिटांची राहणार आहे.

तिसर्‍या फेरीत रवरिींरलश्रळींळ ींशीीं जिल्हा 30 मिनिटे अवधी दिला जाईल तर चवथ्या फेरीत शारीरिक चाचणी ज्यात 7 मिनिटात 1.6 किमी धावणे ,10 पुश अप , 10 सीट अप 20 तर पाचव्या फेरीत हि ए.टी.2 घेतली जाणार आहे.

23 जिल्ह्यांचा समावेश
जळगाव, धुळे, नंदुरबार , अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, नागपूर, उस्मानाबाद पालघर, परभणी रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, वर्धा, वाशीम व यवतमाळ ह्या एकूण 23 जिल्ह्यातील तरुणांना ह्या भरतीचा लाभ मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

*