घरफोडी करणार्‍या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश

0

जळगाव । दि. 2 । प्रतिनिधी-शहरासह जिल्हयात चोरी, घरफोडीचे सत्र सुरुच आहे. दरम्यान घरफोडी करणार्‍या मध्यप्रदेशातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून साडेपाच लाखांच्या मुद्देमालासाह चौघांना अटक करण्यात आली आहे. या चोरटयांनी यावल येथे घरफोडी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल येथील बाबानगरातील शकीलखान सुलतान खान यांच्या घरी दि.31 ऑगस्ट रोजी घरफोडी झाली होती.

यात 85 हजार रुपये रोख, 3 लाख 88 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, 21हजार 690 रुपयांचे तीन मोबाईल असा 4 लाख 94 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेला होता.

याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग, स्थागुशा पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे, यावल पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी तपासचके्र फिरावून रावेर, यावल, अडावद, चोपडा, अमळनेर, जळगाव याठिकाणी चोरटयांचा शोध घेतला.

स्थागुशा पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, सपोनि सागर शिंपी, पीएसआय उत्तम आहिरे यांच्यासोबत यावल पोलिस स्टेशनचे पोहेकॉ. युनुस तडवी, संजीव चौधरी, सिंकदर तडवी, संजय देवरे, संजय तायडे, विकास सोनवणे, सुशिल घुगे, राजेश महाजन, सतिष भोई, राहुल चौधरी, जाकीर अली सैय्यद, स्थागुशाचे सफौ. मनोहर देशमुख, विजय पाटील,रविंद्र पाटील, नरेंद्र वारुळे, सुशिल पाटील, आरसीपी प्लॉटून क्रमांक 6 ते 10 चे कर्मचारी यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्हयातील सातपुडयात जंगलात जावून सापळा रचून सुनिल अमरसिंग बारेला वय 20 रा. गौर्‍यापाडा. ता. चोपडा, मुकेश काशिनाथ चौव्हाण वय 22 रा खापरखेडा ता. सेंधवा.जि.बडवाणी, राकेश उर्फ रायक्या रामलाल बारेला वय 22 देवली ता. वरला जि. बडवाणी व अन्य एक अल्पवयीन चोरटयास अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या ताब्यातून 5 लाख 60 हजार 795 इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चोरटयांनी यावल येथे घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दरम्यान या चोरटयांकडून जिल्हयातील अनेक ठिकाणाच्या घरफोडया उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

*