आरास साकारण्यासाठी मंडळांची लगबग

0

जळगाव ।  प्रतिनिधी : आपल्या लाडक्या गणरायाच्या स्थापनेला अवघे दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सार्वजनिक गणेशमंडळांकडून आरास साकारण्याची लगबग सुरु झाली असून कार्यकर्ते दिवसरात्र आरास साकरीत असल्याचे चित्र शहरातील गणेश मंडळांमध्ये दिसून येत आहे.

गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधडक्यात साजरा केला जात असतो. सर्वचजण वर्षभर आपल्या बाप्पाची अतुरतेने वाट बघत असतात. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला असल्याने शहरातील गल्लतील मंडळांपासून ते मोठ्या मंडळांकडून आरास साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

काही मंडळांचे मंडप बांधणीचे पूर्ण झाले आहे. तसेच आाता केवळ मंडळांकडून गणेशोत्सात भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या आरास साकारण्याचे काम सुरु असल्याने कार्यकर्ते देखील आरास तयार करण्यासाठी दिवसरात्र एक करीत असल्याचे दिसून येत आहे.

मंडळांकडून केली जातेय गणेश मुर्तीची बुकींग

मंडळांतील गणेशाची मुर्ती बुकींग करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून शहरातील विविध भागात मुर्ती तयार करणार्‍यांकडे जावून मुर्ती पसंत करुन मुर्ती बुकींग करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. अधिक वेळ केला जातोय सराव
शहरातील गणेश मंडळांकडून गणेशोत्सवात ज्वलंत विषयांवर सजीव आरास साकारण्यात आली आहे.

या आरासचा सराव कार्यकर्त्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. परंतु गणेशोत्सवाला कमी दिवसांचा काळ शिल्लक असल्याने मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून नेहमीपेक्षा जास्तवेळ सराव करुन घेत आहे.

LEAVE A REPLY

*