राजकारण्यांच्या जाचाला कंटाळुन चाळीसगावच्या गटविकास अधिकार्‍याने केले विष प्राशन

0

चाळीसगाव | प्रतिनिधी : राजकारणांच्या जाचाला कंटाळून येथील गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांनी आज त्यांच्या दालनातील बाथरूममध्ये जात विष प्राशन केले.

दरम्यान त्यांना त्वरीत उपचारासाठी येथील देवरे हॉसिपटलला दाखल करण्यात आले आहे.

गटविकास अधिकारी मधुकर वाघ हे गेल्या महिन्यापासून सक्तीच्या रजेवर होते. त्यातून त्यांना मानसिक ताण निर्माण झाला. दरम्यान आज पंचायत समितीची सभा असल्याने ते सभेस आले होते. सभा सुरू असतांना ते त्यांच्या दालनातील बाथरूममध्ये गेले. तेथे त्यांनी विष प्राशन केले. हे लक्षात येताच त्यांना तातडीने देवरे हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.

खिश्यातील चिठ्ठीत राजकारण्यांची नावे

त्यांच्या खिश्यात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्यांचा छळ करणार्‍या राजकारण्यांची नावे आहेत. यामुळे पंचायत समितीत गोंधळासह घबराहट पसरली आहे.

LEAVE A REPLY

*