७५ कोटींच्या थकबाकीच्या वसुलीसाठी दहिगावला कृषीपंपाचा वीज पुरवठा बंद

0
दहिगाव, ता. यावल| | वार्ताहर :  येथील वीज उपकेंद्रांतर्गत शेती शिवारातील ८२ वीज डिपींवरील कनेक्शन विज वितरण कंपनीच्या आदेशानुसार कर्मचार्‍यांनी बंद केले आहे.

यामुळे कांदे लागवड व रब्बी हंगामातील पिकांना पाणी भरण्याची कामे बंद पडली असल्याने शेतकर्‍यांसह शेतमजुरांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

परिसरातील दहिगावसह सावखेडासिम, कोरपावली, मोहराळा, महेलखेडी, हरीपुरा या गावातील शेतकर्‍यांकडे विजपंपाची विजबिल थकीत रक्कम ७५ कोटीच्या घरात आहे. विजबिल भरणा सुचना देवूनही शेतकर्‍यांनी केलेला नसल्याने नाईलाजाने विजकंपनीला विजजोडणी कट करावी लागली आहे.

रविवार व सोमवार या दोन दिवसात मोहराळा शिवारात २३, सावखेडासिम शिवारात ४५ व दहिगाव शिवारात १४ विज डिपी बंद केल्यात. ज्या शेतकर्‍यांनी नियमित विजबिल भरणा केलेला आहे किंवा जे त्वरीत थकीत रक्कम भरतील अशांना दोन दिवसात विजपुरवठा सुरळीत सुरू करणार असे विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र धांडे यांनी सांगितले आहे.

विज पुरवठा बंद केल्याने शेकडो कांदा लागवड महिलांचा रोजगार बंद पडला आहे.

सध्या शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव नाही. कापूस वेचणी सुरूच आहे. कापसाला भाव नाही. उळीद, मूगाला, मका, ज्वारीचे उत्पन्न घटूनही रास्त भाव नसल्याने कर्जबाजारी झालेले आहेत. त्यातच विजवितरण कंपनीची वसुलीची ही पध्दत म्हणजे शेतकर्‍यांच्या भावनाशी खेळणे आहे. जवळ पैसे नसल्याने आम्ही बिल भरू शकलो नाही. अशा प्रकारानेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा भावना अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या आहेत.

विजडिपी कनेक्शन बंद करण्यासाठी कनिष्ठ अभियंता जितेंद्र धांडे, पी.पी. चौधरी, सलिम तडवी, सर्ङ्गराज तडवी, निलेश चौधरी, शैलेश श्रीरामवार सह शिकाऊ कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*