कर्जमाफीबाबत माध्यमांशी बोलू नका !

0

जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-कर्जमाफीबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला असुन याविषयी माध्यमांशी बोलु नका, असा तुघलकी आदेश सहकार विभागाच्या अधिकार्‍यांना वरीष्ठ कार्यालयाकडुन आल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील शेतकर्‍यांना 34 हजार कोटीच्या कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीचा लाभ देण्याचा शुभारंभ दिवाळीत करण्यात आला.

मात्र शासनाकडे विविध जिल्ह्यांकडुन आलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याने कर्जमाफीचा लाभ देणे थांबविण्यात आले .

एवढेच नव्हे तर प्रथम लाभ मिळणार्‍या शेतकर्‍यांची नावे असलेली हिरवी यादीच शासनाच्या पोर्टलवरून गायब करण्यात आली. दिपपर्वात जिल्हानिहाय काही शेतकर्‍यांची निवड करून कर्जमाफी योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.

मात्र ज्या शेतकर्‍यांची निवड झाली त्यांना देखिल अद्यापपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान राज्यस्तरासह जिल्हास्तरावर देखिल कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा हा गोंधळ मिटत नसल्याची चिन्हे दिसुन येत आहे.

त्यामुळे पारदर्शक असलेल्या भाजपा सरकारच्या या कार्यकाळात वरीष्ठ अधिकार्‍यांनी जिल्हास्तरावरील सहकार विभागाच्या अधिकार्‍यांना कर्जमाफीबाबत माध्यमांशी बोलु नका असा तुघलकी आदेशच दिला असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

जोपर्यंत शासन पुढील आदेश देत नाही तोपर्यंत कर्जमाफीच्या अमंलबजावणीसंदर्भात कुठेही वाच्यता करू नये असेही सुचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*