जळगाव मनपात मानाचा गणपती : ‘स्वच्छ जळगाव’ संकल्पनेवर आरास

0

जळगाव ।  प्रतिनिधी :  मनपा प्रशासनातर्फे मानाचा गणपतीची तयारी सुरु असून स्वच्छ जळगाव या संकल्पेवर आधारित आरास साकारली जाणार आहे. गणशोत्सवाच्या 10 दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.

महानगरपालिका प्रशासनातर्फे दरवर्षी गणरायाची स्थापना केली जाते. महानगरपालिकेचा गणपती शहराचा मानाचा गणपती म्हणून मानला जातो. यावर्षी मानाच्या गणपतीची थीम स्वच्छ भारत अभियांनातंर्गत स्वच्छ जळगाव शहर तसेच भविष्यातील जळगाव शहर अशी राहणार आहे. त्या पध्दतीने आरास करण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान महापालिकेकडून जळगाव फेस्टिवल साजरा करण्यात येणार आहे. दहा दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी जळगावकरांना मिळणार आहे. यांतर्गत मुंबई येथील कलावंतांचे नाटक, आर्केष्टा, ठाणे येथील कलावंतांचा गणेशवंदना हा शास्त्रीय संगीतावर आधारीत नृत्याचा कार्यक्रम, व्यावसायिक कीर्तन, भावगीतांचा कार्यक्रम, आतंरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

मनपा इमारतीच्या प्रांगणात गणेशोत्वासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक, भजन दिंडी, पारंपारिक लोककलेचे दर्शन घडणार आहे.

LEAVE A REPLY

*