मालगाडीचा डबा घसरला, प्रवासी गाड्यांना विलंब

0

भुसावळ । दि.1 । प्रतिनिधी-भुसावळ ते इटारसी रेल्वे सेक्शन दरम्यान भिरंगी ते मानसगाव या रेल्वे स्थानकादरम्यान एन बॉक्स मालगाडीच्या एका डब्याची चाके रूळावरून घसरल्याने दि. 1 नोव्हेंबर 17 रोजी पहाटेच्या दरम्यान अपघात झाला.

यामुळे मध्यप्रदेशातून भुसावळ मार्गे मुंबईकडे जाणार्‍या 12 प्रवासी गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 1 ते 3 तास विलंबाने धावल्या.

मालगाडीचा हा अपघात रेल्वे रूळ कापला की तुटला याबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून हा घातपाताचा तर प्रकार नाही असे बोलले जात आहे. मालगाडी ऐवजी प्रवाशी गाडी असती तर अनर्थ झाला असता.

या अपघातामुळे प्रभावित झालेल्या प्रवासी गाड्या पुढील प्रमाणे- भुसावळकडून मध्यप्रदेशात जाणार्‍या डाऊनच्या गाड्या त्यात 12149 पुणे पटना एक्सप्रेस, 22111 भुसावळ नागपूर व्हाया इटारसी एक्सप्रेस, 12322 मुंबई हावडा मेल, 12141 पाटलीपुत्र एक्सप्रेस, 11015 कुशीनगर एक्सप्रेस, 11033महानगरी एक्सप्रेस, 11057 पठाणकोट एक्सप्रेस तसेच मध्यप्रदेशातून भुसावळमार्गे मुंबईकडे जाणार्‍या अपच्या प्रवासी गाड्यांमध्ये 12780 गोवा एक्सप्रेस, 12716 सचखंड एक्सप्रेस 11056 गोदान एक्सप्रेस, 12142 पाटलीपुत्र एक्सप्रेस, 12294 दुरांतो एक्सप्रेस अशा 12 गाड्या प्रभावीत झाल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

*