शेतकर्‍यांसाठी राष्ट्रवादी किसान सभा रस्त्यावर

0

जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-गेल्या तीन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांविषयी जे निर्णय घेतले ते संशयास्पद असुन शेती आणि शेतकर्‍याला सुरक्षा मिळावी यासाठी राष्ट्रवादी किसान सभा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आज राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत माहिती देतांना प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे म्हणाले की, राष्ट्रवादी किसान सभेतर्फे शेतकरी सुरक्षा अभियान राबविण्यात आले.

तीन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांचे आणि शेतीचे अस्तीत्व संपुष्टात आणण्याचा प्रकार केला आहे. शेतकर्‍याच्या उत्पन्नाला संरक्षित करण्याची गरज आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा पुरता गोंधळ उडाला असुन शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बॅ.ए.आर.अंतुले, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या कार्यकाळातही कर्जमाफी झाली.

मात्र अशी संभ्रमावस्था त्यावेळी नव्हती. राज्य घटनेच्या कलम 41 नुसार भारतीय शेती ही जोखमीची असुन त्याचे नुकसान झाल्यास भरपाई सरकारने करून देण्याची तरतुद आहे.

शेतकर्‍यांची सगळी माहिती सरकारकडे असतांना शेतकर्‍यांना आधार कार्डची मागणी केली जाते. भाजपाचे नेतेही शेतकर्‍यांबाबत विधाने करून त्यांचा अपमान करीत आहे.

महात्मा गांधीच्या सविनय कायदेभंग चळवळीवर आजही आमचा विश्वास असल्याने शेतकर्‍यांच्या हितासाठी राष्ट्रवादी किसान सभेची प्रदेशस्तरीय बैठक दि. 5 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे होणार असुन या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार परीषदेस शिवाजीराव बनकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा समन्वयक विकास पवार, सोपान पाटील, माजी आ. अरूण पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मिनल पाटील, मंगला पाटील, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*