भारतात २७ लाख ९० हजार क्षयरोगाचे रूग्ण

0
मुंबई : वृत्तसंस्था : वर्षभरात भारतात क्षय रोगाचे २७ लाख ९० हजार रूग्ण आढळल्याचे जागतीक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. तर यातील ४ लाख २३ जणांना क्षयरोगामुळे जीव गमवावा लागला आहे.

जागतीक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीनुसार सन २०१६ मध्ये जगात क्षयरोगाचे १ कोटीहून अधिक रूग्ण आढळून आले आहे.यातील निम्मे रुग्ण भारत, इंडोनेशिया व नायजेरीयामध्ये आढळून आले आहेत.

२०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी तो कितपत सफल ठरतो हे तेव्हाच समजेल.
आरोग्यबाबत नागरीकांसह शासनामध्ये असलेली अनास्था यामुळे क्षयरोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.

LEAVE A REPLY

*