भक्तीमय वातावरणात श्रीराम रथ महोत्सव

0

जळगाव । दि.31 । प्रतिनिधी-जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्री राम मंदिर संस्थांतर्फे कार्तीकी एकादशीनिमीत्त काढण्यात आलेला रथोत्सव मोठ्या चैतन्यमय वातावरणात पार पडला.

रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकानी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी सुभाष चौकात दर्शनासाठी जनसागर उसळला होता. यावेळी प्रभु श्रीरामचंद्राच्या गगनभेदी जयघोषाने सुवर्णनगरी दुमदुमली होती.

जळगाव नगरीचे ग्राम दैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्री राम मंदिर संस्थांतर्फे कार्तीकी एकादशीनिमीत्त श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे 4 वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर 7 वाजता महाआरती, पंचपदी भजनाचा कार्यक्रम होवून सकाळी 10.30 वाजता श्री राम मंदिर संस्थांनचे विश्वस्त गादीपती हभप श्री. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात महापुजा करण्यात आली.

यावेळी राज्य जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, आ. चंदूलाल पटेल, आ. राजूमामा भोळे, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, सुभाष चौक पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी महापौर विष्णू भंगाळे, पिपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, अ‍ॅड. सुशिल अत्रे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, डीवायएसपी प्रशांत बच्छाव, सचिन सांगळे, सुनिल महाजन, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. विवेक जोशी, गिरीष कुळकर्णी उपस्थित होतेे. याप्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता रथाची महाआरती होवून प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली.

शहरात जूने जळगाव, सराफ बाजारातील महालक्ष्मी मंदिरात पानसुपारीचा कार्यक्रम होनू रात्री 12 वाजता प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीला पाखली ठेवून वाजत गाजत त्याची महाआरती होवून श्री राम रथोत्सवाची सांगता करण्यात आली.

यंदा रथोत्सवाचे 145 वे वर्ष होते. दरम्यान रथोत्सवाच्या दर्शनासाठी शहरात पंचक्रोशीतून भाविक जळगावात दाखल होवून रात्री उशिरापर्यंत दर्शन घेतले.

 

LEAVE A REPLY

*