ऑनलाईन कामावर शिक्षकांचा बहिष्कार

0

जळगाव । दि.31 । प्रतिनिधी-ऑनलाईनच्या त्रासाला कंटाळून चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा येथिल जिल्हा परिषदेच्या शिक्षकांने आत्महत्या केल्याची घटना घडली. ऑनलाईन प्रणालीचा अतिरिक्त ताण येत असल्याने ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी दि.4 रोजी जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.

मुख्याध्यापकांवर शिक्षणाव्यतिरिक्त ऑनलाईन प्रणालीचे कामे सोपविण्यात आलेले आहे. स्टॉप पोर्टल, मिड डे-मिल, स्टॉर्म प्रणालीसह शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे काम मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आले आहेत.

मात्र ऑनलाईन प्रणालीत तांत्रीक अडचण असल्याने मुख्याध्यापकांवर कामाचा ताण पडतो आहे. त्यातच अनेक शिक्षकांना तांत्रीक ज्ञान नसल्याने ऑनलाईन प्रणालीचे कामे करणे त्यांना अवघड जात आहे.

कामाकाजात येणार्‍या अडचणीबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आले आहे मात्र प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून आजपासून ऑनलाईन कामे न करण्याची भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे.

ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यात आले आहे मात्र शासनाला सहकार्य म्हणून ऑफलाईन काम करण्यास शिक्षकांनी संमती दर्शविली आहे.

जिल्ह्यातील 17 शिक्षक संघटनांच्या शिक्षकांनी हा निर्णय घेतला असून सर्वच शाळांमधील ऑनलाईन कामे बंद ठेवली जाणार आहे. ऑनलाईनच्या कामाचे ताण असल्याने चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाडे येथील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना काल घडली.

शिक्षक आत्महत्येला शासन जबाबदार असून शिक्षक संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाने प्राथमिक शिक्षकांना आधीच वेगवेगळ्या माध्यमातून शासकीय कामकाज सोपविले असून त्यांना शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा शासनाची कामेच गावात फिरुन करावी लागतात. याविरुद्ध गेल्या अनेक दिवसांपासून असंतोष खदखदत आहे.

LEAVE A REPLY

*