शरीराला आग लाऊन उपचाराची अनोखी पद्धत ?

0
बीजिंग | वृत्तसंस्था :  नाना प्रकारचे उपचार व औषधे घेतल्यानंतरही एखाद्या आजारावर काहीच फरक पडत नसेल, तेव्हा रुग्ण प्रचंड हैराण होतो. रोगातून मुक्त होण्यासाठी नेमके काय करावे हेच त्याला सूचेनासे होते. आजारपणामुळे बेजार झालेल्या अशा रुग्णांना दिलासा देणारी एक भलतच उपचारपद्धती चीनमध्ये अवलंबली आहे.

उपचार करूनही एखादा आजार दूर होत नसेल तर या चीनमध्ये वापरल्या जाणार्या या खास प्रकारच्या उपचार पद्धतीत रुग्णाच्या शरीरावर चक्क आग लावली जातो. ही चिनी उपचारपद्धती शेकडो वर्षांपासून अवलंबली जात असून तिच्यामध्ये दवा आणि दारू दोन्हीचा सारखाच वापर केला जातो.

या अनोख्या उपचारपद्धतीमध्ये रुग्णाला सर्वप्रथम झोपण्यास सांगितले जाते. रुग्ण झोपल्यावर त्याला शरीराच्या ज्या भागात सर्वात जास्त त्रास होतो, त्या भागाची निवड केली जाते. त्यानंतर त्याच्या शरीरावर कुठले तरी खास प्रकारचे चिनी औषध लावले जाते आणि त्यावर दारू आणि तेलात भिजलेला टॉवेल ठेवला जातो.

या भिजलेल्या टॉवेलास आग लावली जाते व दुसरीकडे कोरड्या टॉवेलने ती हळूहळू विझविली जाते. औषध शरीरावर पसरवून त्यास आग लावली तर ते आजारावर वेगाने प्रभाव टाकते.

आगीतील धगीमुळे औषधे जास्त प्रभावीपणे काम करते. चीनमध्ये ही उपचारपद्धत मोठया प्रमाणावर अवलंवली जाते. ’फायर ट्रिटमेंट’ म्हणून ओळखली जाणारी ही उपचार पद्धती खासकरून क्वांजनाउ, ङ्गुजियान प्रांतामध्ये वापरली जाते.

LEAVE A REPLY

*