निलंबित पोलिसाने काढली महिला पोलीस कर्मचार्‍यांची छेड !

0

जळगाव । दि.31 । प्रतिनिधी-जळगाव पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या निलंबीत पोलिस कर्मचार्‍यांने मुख्यालयाच्या आवारात महिला पोलिस कर्मचार्‍यांची छेडखानी केल्याची घटना दि.29 रोजी रात्री घडली होती.

दरम्यान आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास या निलंबित पोलिस कर्मचार्‍यांला महिला कर्मचारी व महिलांनी पोलिस मुख्यालयाच्या आवारातून पकडून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. याप्रकारामुळे जिल्हापेठ पोलिसात गोंधळ निर्माण झाला होता.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचार्‍यांची निलंबित पोलिस कर्मचारी गोपाल रामचंद्र सोनवणे रा. पोलिस लाईन याने दि.29 रोजी रात्री 8 वाजेच्या पोलिस मुख्यालयाच्या आवारात छेड काढली होती.

महिला कर्मचार्‍यांने त्याचा प्रतिकार केला असता, त्याने तिला मारण्यासाठी विट उचलली होती. यावेळी पोलिस कर्मचारी महिलेने त्याला दगड मारून त्याठिकाणी काढता पाय घेतला होता.

दरम्यान या महिला पोलिस कर्मचार्‍यांने याबाबत जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. जिल्हापेठ पोलिसांनी निलंबित पोलिस कर्मचारी गोपाल सोनवणे मनोरुग्ण असल्याचे सांगत यावर कुठलीही कारवाई केली नव्हती.

महिला पोलिस कर्मचार्‍यांने याबाबत लेखी तक्रार देखील दिली होती. दरम्यान आज सकाळी गोपाल सोनवणे हा मुख्यालयाच्या आवारात फिरतांना आढळून आला.

महिला पोलिस कर्मचार्‍यांनी सामाजिक कार्यकर्त्या शोभा चौधरी, वंदना पाटील, रत्ना अत्तरदे यांना सांगितले. त्यानंतर दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास गोपाळ सोनवणे याला महिलांनी पकडले. गोपाळ सोनवणे दारुच्या नशेत असल्याने त्याला गाडीत बसवून जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आणण्यात आले.

कारवाईसाठी पोलिसांची टाळाटाळ
निलंबित पोलिस कर्मचारी गोपाळ सोनवणे मनोरुग्ण असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांनी टाळाटाळ केली. दरम्यान महिलांनी कारवाई होत नसल्याने पोलिसबाबत नाराजी व्यक्त केल्याने जिल्हापेठ पोलिसात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

रक्षकच बनले भक्षक
निलंबित पोलिस कर्मचार्‍यांने महिला पोलिस कर्मचार्‍यांची छेड काढल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला माहिला पोलिस कर्मचार्‍यांची छेडखानीबाबतची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. याउलट निलंबित पोलिस कर्मचारी मनोरुग्ण असल्याचे सांगितले. त्यामुळे रक्षकच भक्षक बनले असल्याने महिला पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ता महिलांनी गोपाळ सोनवणे याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

माहिलांची काढली समजुत
जिल्हा पेठ पोलिसात कार्यरत असलेल्या माहिला पोलिस उपनिरीक्षक कविता भुजबळ यांनी महिला पोलिस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ता माहिलांची समजूत घालून रितसर तक्रार घेण्याचे संबंधितांना सुचित केले.

 

LEAVE A REPLY

*