तंबाखूने उड्डाण करतील विमाने

0
जोहान्सबर्ग | वृत्तसंस्था : विमानात बसून आपण तंबाखू मळू शकत नाही. मात्र, भविष्यात याच तंबाखूचा विमानासाठी इंधन म्हणून वापर होऊ शकतो.

होय हे खरे असून तंबाखूच्या झाडापासून तयार होणार्या बायोडिझेलपासून व्यावसायिक विमाने चालवण्यासंबंधीची तयारी सध्या करण्यात येत आहे. यामध्ये आघाडीवर आहे साऊथ आङ्ग्रिकन एअरवेज.

या एअरवेजने गतसाली जुलैमध्ये टेस्ट फ्लाईटच्या रूपात सुमारे ३०० प्रवाशांची क्षमता असलेले विमान टोबॅको बायोडिझेलच्या मदतीने जोहान्सबर्गहून केपटाऊनला नेले होते.

ही चाचणी यशस्वी ठरली होती. यामुळे बोईंग ही अमेरिकन कंपनी आता साऊथ आङ्ग्रिकन एअरवेजचे यासंदर्भात सहकार्य घेत आहे.

तसे पाहिल्यास बायोडिझेल हे अनेक वस्तूंपासून तयार केले जाऊ शकते. यामध्ये एल्गी, ऍग्रीकल्चरल वेस्ट, कॅमेलिना व जेट्रोङ्गा प्लॉंट यांचा समावेश आहे.

दक्षिण आङ्ग्रिकेने याबाबत तंबाखूला प्राधान्य दिले आहे. कारण तंबाखू हे तेथील स्थानिक पीक आहे. यामुळे टोबॅको बायोडिझेलसाठी तंबाखूची उपलब्धता सहज होऊ शकते.

हे बायोडिझेल तयार करण्यासाठी सध्या तंबाखूच्या सोलरिस प्रजातीच्या झाडांवर चाचणी करण्यात येत आहे. हे झाड तंबाखूचे असले तरी त्यात निकोटिनचे प्रमाण अत्यंत कमी असते.

उल्लेखनीय म्हणजे साऊथ आङ्ग्रिकन एअरलाईन्सकडून या वर्षांपासूनच टोबॅको बायोडिझेलचा वापर सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला ङ्गॉसिल फ्यूअलमध्ये बायोडिझेल मिसळून ते विमानासाठी इंधन म्हणून वापरण्यात येईल.

LEAVE A REPLY

*