Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

कुपवाडा जिल्ह्यात सर्च ऑपरेशनदरम्यान दोन दहशतवादी ठार

Share

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. लष्कराने सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांच्याकडील दोन ‘एके-४७ रायफल’सह अन्य काही सामान लष्कराने जप्त केले.

कुपवाडा जिल्ह्यातील गुलूरा गावात २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर ३० राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांची एसओजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची ९२ वी बटालियनच्या जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले.  श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी अब्दुल अहमद गनी (वय ४२) या नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली होती. अब्दुल गनी हे मूळचे कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब येथील रहिवासी होते.

एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. दीड तास चाललेल्या या चकमकीत अखेर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कर यशस्वी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!