सिटींग खासदाराचे तिकीट होणार कट : आ. डॉ.सतिष पाटील

चाळीसगाव येथे सन्मान जनसेवकांच्या गौरव सोहळ्यात प्रतिपादन

0

चाळीसगाव । दि. 9 । प्रतिनिधी :  स्व.अनिल देशमुख यांनी त्यांच्या कर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेतली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्व विचारांच्या लोकांना बरोबर घेवून, गेली चाळीस वर्ष चाळीसगावच्या न.पा.त सत्ता केली. त्यांच्या कर्तृत्वाचे ग्रिनीजबुॅक रेकॉर्डमध्ये नाव होऊ शकते. कर्मामुळे काहीची कामे ओखळले जाते. मला मिळालेल्या माहितीनूसार जिल्ह्यातील एका सिटींग खासदराचे तिकीट कापले जात आहे. त्यांच्या कर्मामुळेच तिकीट कट होत असल्याचे प्रतिपादन पारोळ्याचे आमदार डॉ.सतीष पाटील यांनी केले.

शहरातील राजपूत मंगल कार्यालयात बुधवारी लोकनेते अनिलदादा देशमुख विचार मंचातर्फे सन्मान जनसेवकांच्या आयोजिकत गौरव सोहळ्यात ते बोलत होेते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ नेते उदेसिंह पवार, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, अ‍ॅड. ईश्वर जाधव, माजी जि.प.सदस्य सुभाष चव्हाण, माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख, वैशाली मंगेश पाटील, अनिता दिलीप चौधरी, कॉग्रेसचे अशोक खलाणे, भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अशालता चव्हाण, विश्वास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित आहेत. या सोहळ्यात चाळीसगाव येथे गेल्या 50 वर्षात विविध संस्था, सहकार, शिक्षण व राजकारणात योगदान देणार्‍या 700 हून अधिक लोकप्रतिनिधींचा व जनसेवकाचा गौरव करण्यात आला.

पुढे बोलतांना डॉ.सतीष पाटील म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात विचारांची प्रचंड शिजोरी आहे. राजकारणापलीकडे जावून जीवनात काही तरी केले पाहिजे, त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा गौरव सोहळा. सर्व विचारांचे लोक एकाच व्यासपीठावर येण्याचे एकमेव कारण म्हणजे स्व.अनिलदादा देशमुख. दादाना कधीही पक्ष लागला नाही. त्यांच्या चांगल्या कामांमुळेच आजही चाळीसगावची ओळख त्यांच्या नावाने आहे.

पुढे ते जिल्हा दुधसंख्याने प्रमोद पाटील यांच्याकडे पाहून म्हणाले की, खासदारकीचे तिकीट जेव्हा मिळेल, तेव्हा मिळेल परंतू आपण प्रयत्नशिल राहिले पाहिजे. त्यासाठी सतत काम केले पाहिजे. जिल्ह्यातील एक सिटिंगी खासदारचे तिकट कट होत असल्याची माहिती मला मिळाली असून त्यांच्या कर्मामुळेच तिकीट कट होत असल, तर मला माहिती असेही ते म्हणाले. पुढे त्यांनी जिदंगी का सफर, है कैसा सफर… असे चित्रपटतील गीत म्हणून अनिलदादाच्या कर्तृत्वाबद्दल माहिती दिली.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी सांगीतले की, राजकारणात अनेक जण संधीचा शोधात असतात ती ज्याला मिळाली त्याला संधीसाधू म्हणता येणार नाही. माणसाची ओळख ती त्याच्या सेवा ,समन्वय व संघर्षातून होते. त्यामुळे राजकारणात सेवा असली पाहिजे.

कै. देशमुख हे नगराध्यक्ष असताना मी चोपडा पालिकेचा नगराध्यक्ष होतो तेव्हा आमच्यात विकासावर चर्चा व्हायची आमच्याकडे गेल्या उन्हाळ्यात अठरा दिवसात अर्धा तास पाणी आले मात्र चाळीसगावात पाणीच पाणी होते. नवी चेतना नवी ऊर्जा त्यांच्यात होती. म्हणून अनिल दादा चे नाव घेताच चाळीसगाव ची ओळख येते. असे काम करा की आपल्या नावाने गाव ओळखले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्तविकात राजीव देशमुख यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सोहळा सोहळ्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून मोठी उपस्थिती लाभली होती. यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, भूषण पाटील, अतुल देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाम देशमुख, पं.स.चे राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, भगवान पाटील, प्रशांत देशमुख, मिलिंद शेलार, जयसिंग भोसले आदी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

*