शहरातील 20 मंडळांनी घेतली महावितरणची परवानगी

0

जळगाव ।  प्रतिनिधी :  महावितरणकडून गणेश मंडळांसाठी अल्पदारात तात्पुरती वीजजोडीणी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. दरम्यान आजपर्यंत शहरातील 20 गणेश मंडळांनी परवानगीसाठी लागणारे फॉर्म घेवून गेले असून या मंडळांना महावितरणकडून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता व्ही.एस. कापुरे यांनी दिली.

महावितरणने गणेश उत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी मंडळांकडून प्रतियुनिट 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या अल्प दराने तात्पुरती वीजजोडणी महावितरणकडुन दिली जात आहे. मंडळांना वीजजोडणी देण्यासाठी महामंडळाकडून तयार करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेत गणेश मंडळांना परवानगी दिली जात आहे. दरम्यान काल पासून शहरातील 20 मंडळांनी वीजजोडणीसाठी आवश्यक असलेले फॉर्म घेवून गेले आहे. दरम्यान या मंडळांना महावितरणकडून वीजजोडणी देण्यात येणार आहे.

डिमांडनोट भरल्यानंतर मिळणार वीजजोडणी

गणेश मंडळांनी वीजजोडणीसाठी महावितरणकडे अर्ज सादर केल्यानंतर मंडळांनी डिमांडनोट भरणे आवश्यक आहे. डिमांटनोट भरल्यानंतरच गणेश मंडळांना वीजजोडणी दिली जाणार आहे.

दामिनीपथकाची राहणार करडी नजर

महावितरणचे अधिकारी-कर्मचारी स्थानिक पातळीवर गणेशमंडळांना भेटून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तासेच अनाधिकृत वीज वापरणार्‍या गणेशमंडळांवर दामिनी पथकांची करडी नजर असणार आहे. तसेच मंडळांमध्ये आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास गणेशमंडळ पदाधिकार्‍यांनी महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील महावितरणकडून करण्यात आले आहे.

असे आकारले जाणार डिमांडनोटचे दर

गणेश मंडळांनी मागणी केल्यानुसार त्यांना वीजजोडी देण्यात येणार आहे. यात मंडळांकडून सिंगफेजसाठी किमान 2 हजार रुपयांची तर थ्री-फेजसाठी किमान 5 हजार 500 रुपयांची डिमांडनोट भरणे आवश्यक असून गणेशोत्सव पार पडल्यानंतर वीजबिलाची रक्कम डिमांडनोटमधून कपात करुन उर्वरीत रक्कम मंडळांना परत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*