चोपड्याच्या समाजकार्य महाविद्यालयात शिक्षक दिन व प्रेरणा पुरस्कार सोहळा संपन्न

0

चोपडा : प्रतिनिधी | येथील भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयात शिक्षक दिन व प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ.पुनम गुजराथी होत्या.

याप्रसंगी विशेष सन्माननीय अतिथी म्हणून भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या सचीव सौ.अश्विनी गुजराथी, प्रा.डॉ.के.एन. सोनवणे ( उप-प्राचार्य-कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,चोपडा), प्राचार्य राजेंद्र महाजन (ललित कला महाविद्यालय,चोपडा) हे होते.कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालया च्या सांस्कृतिक समितीने केले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विचार पिठावरील मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर यांनी केले.कार्यक्रमा दरम्यान समाजकार्य महाविद्यालयातील प्रा.अनंत देशमुख यांनी आपल्या कालकथीत मातापित्यांच्या पवित्र आठवणींना उजाळा मिळण्याच्या निमित्ताने  समाजकार्य स्नातक व समाजकार्य पारंगत परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रायोजित ‘प्रेरणा’ पुरस्काराचे वितरण गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या  वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षकदिना निमित्ताने बोलतांना प्रा.डॉ. मोहिनी उपासनी यांनी आपल्याला जीवनात भेटलेल्या गुरुजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या जडणघडणीतील त्यांचा सहभाग स्पष्ट केलं. प्रा.डॉ.विष्णू गुंजाळ यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा परिचय देऊन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल विचार व्यक्त केले.

डॉ.सोनवणे यांनी शिक्षकाचे जिवनातील महत्व सांगितले. प्राचार्य महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर मत व्यक्त केले, टीव्ही व मोबाईल या सारख्या साधनांचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला दिला. सौ.पुनम गुजराथी यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता बाळगण्याचा सल्ला देऊन शिक्षकांंमुळे जीवनाला उचित दिशा मिळते-यश मिळतेे हे सांगितले.

कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.काजल हिने संपादित केलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीचे प्रा.डॉ. विनोद रायपुरे,प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे,प्रा.ज्ञानेश्वर भागवत यांनी परिश्रम घेतले.प्रा.आशिष गुजराथी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे यांनी केले, आभार डॉ.विनोद रायपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

LEAVE A REPLY

*