डान्सींग लाईटचा डॅझल ब्ल्यू-टूथ स्पीकर

0
पेबल कंपनीने डान्सींग लाईटने युक्त असणारा डॅझल हा ब्ल्यु-टुथ स्पीकर बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. हा स्पीकर ऐन सणासुदीच्या काळात बाजारात दाखल झाला असल्याने या स्पीकरला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

या मध्ये पेबल कंपनीच्या डॅझल या मॉडेलची भर पडली आहे. या मॉडेलमध्ये तब्बल १० मीटरपर्यंतची कनेक्टिव्हिटी असणारे ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञानाने सज्ज असा आहे. तसेच यातील दुसरे लक्षणीय फिचर म्हणजे डान्सींग लाईट होय. म्हणजे यात आरजीबी एलईडी लाईट देण्यात आले असून ते संगीताच्या तालावर चालू-बंद होतात. त्यामुळे या स्पीकरचे हे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. तसेच विशेष करून अंधारात हे लाईट खूप आकर्षक दिसतात.

यात १० वॅट क्षमतेचे स्पीकर देण्यात आले असून याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या एचडी साऊंडचा आनंद घेता येतो. ब्ल्यु-टुथशिवाय यात युएसबी, मायक्रो-युएसबी आणि ऑक्झ-इनपुटची सुविधा देण्यात आलेली आहे.

याच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमधील संगीत यावर ऐकता येईल. तसेच यात एफएम रेडिओदेखील इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

*