भुसावळात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

0
 भुसावळ : केंद्र सरकारतर्फे पेट्रोल, डिझेल भाव वाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेस पक्षासह समविचारी पक्षांतर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला भुसावळसह परिसरात समिश्रम प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता समविचारी पक्षांनी व्यापार्‍यांना बंदबाबत आवहन करण्यात आले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम यांच्या नेृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला होता.शांततेत बंद पार पडला.
 भारत बंद निमित्ताने भुसावळ शहरात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम यांच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून व्यापार्‍यांना बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र पाटील, मुन्ना सोनवणे, शहराध्यक्ष शे.पापा शे कालू, प्रा. एम.आर. संधानशिव, पीआरपीचे राजेश डोंगरदिवे, कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस विजय तुरकेले, शैलेश आहिरे, भगवान मेढे, संतोष साळवे, विलास खरात, मेहबुब भाईल, अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मो.मुनव्वर खान, सलीम खान, जे.बी. कोटेचा, महिला शहराध्यक्ष कल्पना तायडे, प्रदेश कॉंग्रेस सदस्या अनिता खरारे, युवती सेलच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गाढेकर, मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष मयुरी पाटील, ऍड. कैलास लोखंडे, मनसे तालुकाध्यक्ष श्री. पाठक, शहराध्यक्ष रिना साळवी, विनोद पांडे, कॉंग्रेसचे विवेक नरवाडे, रहिम कुरेशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते. शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ बंद आवहन रॅलीचा समारोप करण्यात आला. बंद शांतते पार पडला.
 एस.टी.बंद- दरम्यान, भारत बंद असल्यामुळे सकाळी ८ वाजेपर्यंत मुक्कामाहून परतणार्‍या एसी गाड्यांशिवाय एकही बस रस्त्यावर धावली नाही यामुळे एसटी आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*