शाळा सिद्धी बाह्य मूल्यमापन : वार्षिक तपासणीच रद्द होणार

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून शाळांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी केंद्राने शाळासिद्धी ही मूल्यांकनाची प्रक्रिया आणली आहे.

त्याअंतर्गत यापुढे शाळांच्या वार्षिक तपासणीऐवजी शाळासिद्धी बाह्यमूल्यमापन होणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी पर्यवेक्षीय यंत्रणेकडे सोपविली जाणार आहे.

याबाबत माहिती अशी की, शाळासिद्धी उपक्रमांतर्गत गेल्या जानेवारी महिन्यात सर्व शाळांची रजिस्टे्रशन प्रक्रिया पार पडल्यानंतर शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. त्यात राज्यातील अ श्रेणीत आलेल्या सुमारे नऊ हजार शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागातर्ङ्गे करण्यात आले.

दरम्यान, ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतर राज्यातील सर्व शाळांचे दरवर्षी स्वयंमूल्यमापन आणि दरवर्षी बाह्य मूल्यमापन करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यानुसार ङ्गक्त अ श्रेणीत आलेल्या शाळांचेच नव्हे तर सर्व शाळांचे मूल्यमापन दरवर्षी होणार आहे.

त्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी शाळासिद्धीची राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. तसेच सध्या केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

यानंतर शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्यासाठीही शाळासिद्धी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या शाळा तपासणीचे काम शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ही पर्यवेक्षीय यंत्रणा करत आहेत.

त्यासाठी या सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेला शाळासिद्धीचे प्रशिक्षण दिल्यास सर्व शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. त्यानुसार शाळासिद्धी बाह्यमूल्यमापनाच्या प्रक्रियेत सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेला सामावून घेण्यात आले असून त्यांच्यावर दरवर्षी शाळासिद्धी बाह्यमूल्यमापनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

यापुढे आता शाळांची वार्षिक तपासणी न होता पर्यवेक्षीय यंत्रणेमार्ङ्गत शाळासिद्धी बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया होणार आहे. सर्व शाळांनाही दरवर्षी स्वयंमूल्यमापन करावे लागणार आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना शाळासिद्धीच्या दृष्टीकोनातून स्वयंमूल्यमापनासाठी तर पर्यवेक्षीय यंत्रणेला बाह्यमूल्यमापनासाठी सामोरे जावे लागणार आहे. शाळासिद्धीच्या माध्यमातून शाळांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*