जलसंपदा मंत्र्यांची आदिवासींसोबत दिवाळी

0

रावेर । दि. 21। प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय मंत्री ना.गिरीष महाजन यांनी पाल, यावल अभयारण्यातील गाडर्‍या जामन्या, गारखेडा, उसमळी, लंगडा आंबा परिसरातील दुर्गम भागातील वाडया पाड्यावरील आदिवाशी बांधवांसोबतआपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सोबतीने जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी दिवाळी साजरी करून एक नवीन आदर्श लोक प्रतिनिधींसमोर निर्माण केला आहे.

पाल येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वप्रथम त्यांनी भेट देऊन पाहणी केली येथे रुग्ण कल्याण समितीच्या वतीने दीपक नगरे, विनय पवार, वैद्यकीण अधिकारी डॉ.श्रीमती बारेला यांनी स्वागत केले.

यानंतर पाल येथील ब्रह्मलीन लक्ष्मण चैतन्य महाराज आश्रामामध्ये त्यांनी दर्शन घेतले. यावेळी प.पू.गोपाळ चैतन्य महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.

गारखेडा येथे आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्य करित स्वागत व सत्कार केला. लंगडाआंबा येथे दुर्गम भागात सेवा देणार्‍या वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीचा फराळ व मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.

तर 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ देखील वृक्षारोपण करून केला. या नंतर उसमळी येथे रात्री मुक्कामी राहून आदिवासीं सोबत स्नेहभोजन घेतले. फटाक्यांना तिलांजली दिली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर करण्यात आले.

प्रदुषण टाळण्यासाठी फटाके फोडण्यावर बंदी घातली. ज्या ठिकाणी वाहनाने येणे जाणे अडचणीचे आहे. तसेच मोबाईल रेंज नाही अशा दुर्गम भागात दिवाळी साजरी करणारे ना.गिरीष महाजन हे जिल्हयातील पहिले मंत्री होय. उसमळी येथे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला.

त्यांचे सोबत जामनेर नगराध्यक्ष सौ.साधना महाजन, शरद ढोले, योगेश्वरजी गर्गे, अनिल पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जि.प.उपाध्याक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पदमाकर महाजन, तालुका सरचिटणिस वासुदेव नरवाडे, पं.स.गटनेता पी.के. महाजन, भाजपा युवा जिल्हाउपाध्यक्ष अमोल पाटील, जि.प.सदस्य अमित देशमुख, यावल तालुकाध्यक्ष नंरेंद्र कोल्हे, यावल संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विलास चौधरी, पिंटू राणे, हिराभाऊ पाटील, उजैनसिंग राजपुत, रामेश्वर नाईक, पितांबर भावसार, गोमती बारेला, गाडर्‍या जामन्या सरपंच भरत बोरला, गारखेडा सरपंच गाठू बारेला, वन विभागाचे सहा वन संरक्षक अश्विनी खोडपे, वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, श्री.सोनवणे, व्ही. एम. पाटील, मुख्याध्यापक गोकुळ तायडे, अधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*