मोबाईल लांबविणार्‍या परप्रांतीय ‘हायटेक ’ टोळीला अटक

0

जळगाव । दि.23 । प्रतिनिधी-शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना टार्गेट करून त्यांच्या खिश्यातील महागडे मोबाईल लांबविणार्‍या झारखंड, बिहारच्या परप्रांतीय हायटेक टोळीला रामानंद नगर पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या सहा जणांना टोळींमध्ये तीन जण अल्पवयीन असून या टोळीतील सर्वजण संभाषण करण्यासाठी व्हॉटसअप चॅटींग, व्हॉटसअप कॉलींग व व्हॉटसअप व्हाईसचा वापर करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच टोळीचा स्पेशल वकील देखील असल्याचे डीवायएसपी सचिन सांगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काही दिवसांपूर्वी पिंप्राळा बाजारातून भाजीपाला घेत असतांना प्रदीप दामु पाटील यांचा मोबाईल चोरीला गेला होता .याबाबत रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहीदास ठोंबरे. सहाय्यक फोजदार गोपाल चौधरी, पोना प्रदीप चौधरी, शरद पाटील, अतुल पवार, सागर तडवी यांची पिप्राळा बाजारात पेट्रोलिंग लावण्यात आली होती.

पेट्रोलिंग करित असतांना त्यांना एका व्यक्तीच्या हालचालीवर शंका आला त्याचा पाठलाग करण्यात सुरवात केली. पाठलाग करित असतांना ते भुसावळ येथे पोहचले.

त्याठिकाणावरून संशयित आरोपी हा एकटा नसुन टोळी असल्याचे समजले.त्याठिकाणी तीन जणांना अटक करून लागलीच एक पथक अकोला येथे रवाना करण्यात आले.

त्याठिकाणी या टोळीतील बाकी संशयित आरोपीना जेरबंद करण्यात आले. चांद मोहम्मद खाजाउद्दीन (वय 18, रा.हल्ली मुक्काम छोटी उमडी, अकोला, मुळ राहणार महाराजपुर,मोतीझरणा ता.तालझाडी जि.साहेबगंज झारखंड), खुरसीद आलम शेख मंजुर (वय18 रा गाव दिलापुर, ता.मनिहारी जि.कठीहार बिहार) शेख जुलफान शेख मुरसेद (वय 19 महाराजपुर,मोतीझरणा ता.तालझाडी जि.साहेबगंज झारखंड) यांच्यासह तीन अल्पवयीन मुले सहभागी आहे.जिल्ह्यातील अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जळगाव, अकोला, नाशिक, नांदेड, नगर,नागपूर याठिकाणी मोबाईल चोरीचे गुन्हे

अटक करण्यात आलेल्या हायटेक परप्रांतीय टोळीने जळगाव, अकोला, नाशिक, नांदेड, अहमदनगर, नागपुर याठिकाणी आठवडे बाजारात मोबाईल लांबविले असून आता रामानंद नगर पेालिसांनी त्यांच्याकडून पाच मोबाईल हस्तगत केले आहे. जवळपास या टोळीने अकोला शहरातून 150 पेक्षा अधिक मोबाईल तर आतापर्यंत 500 ते 550 महागडे मोबाईल लांबविले आहे. हे मोबाईल बंगाल, ओडीसा, बिहार येथे विकण्यात आले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सर्व मोबाईल चोर संभाषण करण्यासाठी मोबाईल कॉलिंग करित नसत ते मोबाईल मधील ्रव्हॉस्ट अ‍ॅपफ चा उपयोग करित असत.या अ‍ॅपच्या माध्यमातुन ते कॉलिंग,व्हाईस रोकॉडिग,व्हिडीओ कॉल तसेच चॉट करून संभाषण करित असत.त्यामुळे त्याचे रेकॉर्ड लवकर मिळू शकत नव्हते.

मोबाईल चोरण्यासाठी लहान मुलांचा वापर

टोळीकडून मोबाईल चोरण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यात येत असून मोबाईल चोरल्यानंतर 10 ते 12 मोबाईल जमा झाल्यानंतर ते अकोला व त्यानंतर तेथून झारखंड येथे पाठविण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीतील सहा जणांपैकी 3 तीन अल्पवयीन असून 9,11 व 16 वर्षांची आहे.
बाजारातील महिला,

पुरुषांना टार्गेट

मोबाईल चोरणारी परप्रांतीय टोळी रेल्वे मार्गावरील मोठया शहरातील बाजारांमध्ये जावून महिला व पुरुषांना टार्गेट करीत असल्याचे त्यांचे मोबाईल लांबवित असायची. या टोळीचे मुख्य ठिकाण अकोला आहे. मोबाईल चोरल्यानंतर तो लागलीच दुसरा व्यक्ती घेवून तिसर्‍याकडे देत असे त्यामुळे कोणाला काहीही समजत नसे मोबाईल कोणी लांबविला.

LEAVE A REPLY

*