अमळनेर पालिकेत नऊ सफाई कामगारांचे निलंबन :  कामगार नेत्याची सोशल मिडियावरून नाराजी

0
राजेंद्र पोतदार | अमळनेर :  येथील भाजीपाला बाजारातील दुर्गंधीयुक्त कचरा न उचलल्याप्रकरणी नगरपरिषदेचे आठ सफाई कर्मचारी, एक वाहन चालक असे एकूण ९ जणाना निलंबित केले तर दोन मुकादमास कारणे दाखवा नोटिस बजावल्या आहेत.

याप्रकरणी मूख्याधिकारी पी.जी. सोनवणे यांनी मूळ निलंबन प्रतीवर सही करण्यास नकार दिल्याने प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी निलंबन पत्र आपण मागे घेत असल्याचे सांगितले.

तर सत्ताधारी गटाच्या कामगार नेत्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा करीत सोशल मिडीयावरून नाराजी व्यक्त करित एल्गार पूकारला आहे.

दि. १४ रोजी मुख्याधिकारी यांच्या वतीने प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी वाहन चालक श्यामराव करंदीकर, सफाई कर्मचारी विजय बिर्‍हाडे, कैलास बैसाणे, सिद्धार्थ संदानशिव, शे.अकील शे.सलीम, दिलभर बिर्‍हाडे, प्रकाश सोनवणे, गणेश सपकाळे, हयात खॉं लतीङ्ग खॉं पठाण यांना १५ मे पासून निलंबनाचे आदेश दिले आहेत.

त्यात हयात खॉं पठाण हे यात्रेच्या काळात अर्ज न देता गैरहजर होते. तर सफाई कामगार यांना वारंवार तोंडी सुचना देवूनही सतत गैरहजर राहत असल्याचे म्हटले आहे.

तसेच कर्मचार्‍यांकडून कामे करून न घेतल्याने मुकादम अनिल बाविस्कर, बलराम गिरधारी हटवाल यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित का करू नये? म्हणून कारणे दाखवा नोटिस देण्यात आली आहे.

याप्रकरणी जातिभेद करून व कार्यालयीन दबावामुळे हा कारवाई करण्यात आल्याचे कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सोशल मिडीयाद्वारे नाराजी व्यक्त करीत ज्या भाजीपाला बाजारात न.पा.कर्मचारी वर्षानुवर्ष सफाई करीत आहेत, त्या जागेवर नगरपरिषदेची गेल्या अनेक वर्षा पासून भाडे बाकी असल्याचे सांगत कारवाई चूकीची असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी नपा कामगार यूनियनच्या वतीने पालीकेला व महसूल प्रशासनाला तक्रारी केल्या आहेत.

दरम्यान याबाबत काही सफाई कामगारांनी सांगितले, की कामगार दिन व बौध्द जयंतीला शासकीय सूट्टी असतांनाही आमचे खाडे लिहिण्यात आले.

नियमानुसार शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे कामे करावी असा नियम असतांनाही आम्ही गावाची यात्रा काळात शहर अस्वच्छ नको म्हणून कामे करतो, तरी ही आम्हाला मानसिक त्रास दिला जातो आम्ही कोणालाही घाबरून कामे करू असा अर्थ काही सत्ताधारी काढत असतील तर ते चूकीचे आहे, आम्ही गावाचे देणे लागतो म्हणून हि कामे करतो.

शहरात अनेक सुशिक्षित भागात गटारीत शौचालयाचा मैला सोडलेला आहे, याची सफाई करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. यावर सत्ताधारी गटाने कार्यवाही न केल्यास आम्ही त्या भागातील गटारीच स्वच्छ करणार नाही, असा पावित्रा घेण्याचे निश्चित केल्याचे सांगितले. या गंभीर विषयावर सत्ताधारी गटाला हे राम म्हणण्याची वेळ येते का? या कडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*