यावल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देतांना तक्रारदाराचे विषप्राशन : तब्येत गंभीर

0

यावल । प्रतिनिधी : पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आलेल्या व्यक्तीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.  विष प्राशन करणारे व्यक्तीचे नाव मो.फारूक मो.अब्दुल समद असे आहे. मो.फारुख यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे

शहरातील रहिवासी मो.फारूक मो.अब्दुल समद यांचा शहरातील रहिवासी सय्यद अशपाक सय्यद निसार यांच्याशी पैशाच्या देवाण-घेवाण वरून वाद झाला बुधवारी सकाळी शहरातील चौकाजवळ हा वाद सुरू असताना फारूक यांनी यावल पोलिस स्टेशन गाठले. साडेदहा वाजता पोलिस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार संजीव चौधरी हे त्यांची तक्रार लिहून घेत होते.

या दरम्यानच त्यांना संताप अनावर झाला व त्यांनी त्यांच्या जवळील असलेली एका विषारी द्रव्याची बाटली काढून विषारी द्रव्य प्राशन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही जणांनी त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हातातील बाटली हिसकावली या ओढा-ताणमध्ये थेट पोलिस ठाण्यातच विषारी द्रव्य फेकले गेले. पोलिसांनी फारुक यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार दाखल करण्यात आले.

डॉ. परवीन तडवी, सरला परदेशी, डॉ. उमेश कवडीवाले यांनी प्रथमोपचार केले. फारुक यांची प्रकृती खालवल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार्थ हलवण्यात आले आहे. घटनास्थळी तात्काळ पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर आदींनी पंचनामा केला तर या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सदर वाद विवाद हे व्याजाच्या पैशातून झाल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*