शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

0
पुणे / शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणार्‍या शिक्षण उपसंचालकांविरोधात शिक्षण हक्क मंचच्यावतीने कार्यालयासमोरच बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
खासगी शाळेतील फी वाढीसंदर्भात शासनाकडे पालकांनी तक्रार केली होती, पण त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने पालकांकडून हे आंदोलन केले जात आहे.

शहर आणि जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून खासगी शाळेतील फी वाढीवरून पालकांमध्ये संभ—म निर्माण झाला आहे. पालकांनी शासनाकडे दाद मागितली.

पण मनमानी पध्दतीने फी वाढ करणार्‍या खासगी शाळांवर राज्य सरकारने कारवाई केली नाही. शाळेच्या आडमुठ्या कारभाराबद्दल अनेकवेळा पालकांनी तक्रार करूनही कारवाई केली नाही.

उलट शिक्षण उपसंचालक त्यांच्यावर कारवाई करण्यास चालढकल करत आहेत.

त्यामुळे आता पालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज सोमवारी शिक्षण हक्क मंचच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले असून पालकांनी प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

LEAVE A REPLY

*